Tuesday, July 9, 2024

सलमान खानच्या भाचीचे अलिजे अग्निहोत्रींचे जाहिरात विश्वात पदार्पण, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

सध्या बॉलिवूडच्या ग्लॅमर जगात अनेक नवनवीन कलाकार हळूहळू एन्ट्री घेताना दिसत आहे. काही कलाकार सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात करत आहे तर काही छोट्या छोट्या भूमिका साकारत त्यांच्या करियरच्या गाडीचा श्री गणेशा करताना दिसत आहे. या नवीन कलाकारांमध्ये काही चेहरे इंडस्ट्रीबाहेरील तर काही इंडस्ट्रीशी संबंधित असणारे आहेत.

या नवीन कलाकारांच्या यादीत अजून एक नवीन नाव जोडले जात आहे, आणि ते नाव आहे अलिजे अग्निहोत्रीचे. अलिजे अग्निहोत्री ही दबंग खानची भाची असून, ती निर्माता अतुल अग्निहोत्री आणि सलमानची बहीण असणाऱ्या अलवीरा यांची मुलगी आहे. अलिजेबद्दल जरी जात कोणाला अजूनपर्यंत माहित नसले तरी ती सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. तिला लाखो फॉलोवर्स असून, नेटकऱ्यांसाठी तिचे नाव नवीन नाही.

अलिजे अग्निहोत्रीला देखील सिनेजगतात करियर करण्याची इच्छा आहे. मात्र याची सुरुवात तिने टीव्ही कमर्शियलमध्ये काम करून करायचे ठरवले आहे. अलिजे अग्निहोत्रीने नुकतेच एका जाहिरातीत काम केले असून, त्या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका ज्वेलरी ब्रँडच्या कमर्शिअलसाठी तिने शूट केले आहे. या व्हिडिओमध्ये, अलिजेने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला असून, त्यावर अतिशय नाजूक आणि एलिगंट असे दागिने घातले आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

अलिजे अग्निहोत्रीने खुलासा केला की, तिने तिचे कान कधीही टोचले नव्हते. तिला बहुतकरून नेहमी अंगठ्या, नेकलेस आणि पैंजण घालण्यास जास्त आवडतात. यापूर्वी, अलिजे अग्निहोत्री सीमा खानच्या ब्राइडल कलेक्शनसाठी रॅम्प वॉक करतानासुद्धा दिसली होती.

एका बातमीनुसार अलिजे अग्निहोत्री अवनीश बडजात्या दिग्दर्शित चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहे. अवनीश हा सूरज बडजात्या यांचा मुलगा आहे. या सिनेमात सनी देओलचा मुलगा राजवीर देखील दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. जरी याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी अलिजे अग्निहोत्री तिच्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी जोमाने करत आहे. तिने दिवंगत कोरियोग्राफर सरोज खान यांच्याकडून डान्सचे प्रशिक्षणही घेतले आहे.

सलमान खान आपला पुतण्या निर्वान खानला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे. सोहेल खान आणि सीमा खान यांचा मुलगा निर्वान खान सलमान खानच्या ‘टायगर ३’च्या शूटिंगसाठी परदेशात गेला आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा