Saturday, July 6, 2024

‘दबंग’ खानच्या कुटुंबातील ‘ही’ सदस्य करतेय चित्रपटसृष्टीत पदार्पण

सलमान खानच्या कुटुंबाचा ग्लॅमर इंडस्ट्रीशी जुना संबंध आहे. सलमानचे वडील सलीम खान हे एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत राहिले. आता सलमानच्या कुटुंबातील एक नवीन सदस्य मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करणार आहे.

सलमान खानची भाची अलीजे अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची माहिती समोर आली आहे. अविनाश बडजात्याच्या चित्रपटाद्वारे अलीजे डेब्यू करणार असल्याची बातमी आली आहे.

अविनाश बडजात्या हा चित्रपट निर्माता सूरज बडजात्याचा मुलगा आहे आणि या चित्रपटाद्वारे अविनाश दिग्दर्शनात पदार्पण करणार असल्याची माहिती आहे. या सिनेमात सनी देओलचा छोटा मुलगा राजवीर मुख्य नायकाच्या भूमिकेत असेल, असे म्हटले जात आहे. तो अलीजेच्या ओपोजिट रोलमध्ये असेल.

अलीजेविषयी बोलायचे झाले, तर ती सलमानची बहीण अलविरा खान आणि अभिनेता अतुल अग्निहोत्रीची मुलगी आहे. अतुल अनेकदा आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर शेअर करत असतो. अलीजे बर्‍याच पार्ट्यांमध्येही दिसली आहे. अलीजेचा जन्म 21 सप्टेंबर 2000 रोजी मुंबईत झाला होता. तिला सुरुवातीपासूनच ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये रस आहे. तिने ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक सरोज खानकडून नृत्याचे धडेही घेतले आहेत.

सलमान खानच्या ‘दबंग 3’ चित्रपटाद्वारे अलीजे डेब्यू करणार असल्याचे वृत्त त्या दिवसांत समोर आले होते. तथापि, नंतर या वृत्तांना अतुल अग्निहोत्रीने चुकीचे असल्याचे सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा