Monday, October 13, 2025
Home बॉलीवूड सलमान खानने सिनेमात चक्क एका सिनेमात घातली आहे बिकिनी, काय होता तो किस्सा घ्या जाणून

सलमान खानने सिनेमात चक्क एका सिनेमात घातली आहे बिकिनी, काय होता तो किस्सा घ्या जाणून

सलमान खान बस नाम ही काफी है! बॉलिवूडचा दबंग खान असणाऱ्या सलमानला ओळखत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वच वयोगातील आवडता अभिनेता म्हणून सलमानचे नाव घेतले जाते. दमदार अभिनय आणि ऍक्शनसाठी त्याची जास्त ओळख आहे. सलमान हा अतिशय त्या मोजक्या कलाकारांमध्ये गणला जातो, ज्यांनी चित्रपटांमध्ये कोणत्याही प्रकारचा इंटिमेट सीन दिला नाही. त्याला स्वतःला असे काही आवडत नाही, त्यामुळे पडद्यावर देखील असे करणे टाळत असतो. त्याला अभिनेत्रींनी छोटे कपडे घालणे देखील अजिबात आवडत नाही. मात्र असे असले तरी त्याने स्वतः एका सिनेमात चक्क बिकिनी घातली होती. काय होता तो किस्सा घ्या जाणून.

सलमान खानचा १९९० साली ‘बागी’ नावाचा एक सिनेमा आला होता. याच सिनेमात त्याने बिकिनी घातली होती. सिनेमातील एका सीनमध्ये सलमान बिकिनी घातलेला दिसतो. बऱ्याच दिवसांपूर्वी एका शोमध्ये त्याने या सीनबद्दल भाष्य केले होते. तो म्हणाला की, त्यांनी एक इंग्लिश सिनेमा पाहून त्यातला तो सीन घेतला होता. तेव्हा एवढे कॉपीराइटचे इशू नव्हते. तो म्हणाला की, “मला बिकिनी घालून पाळायचे होते. मात्र त्या दिवशी नेमके सेटवर क्रू लोकं सोडून खरी पब्लिक देखील होती. ते सर्व माझ्या मागे पाळायला लागले होते. तो दिवस माझ्या आयुष्यातील खूपच वाईट होता. मी लाजेने लाल झालो होतो. आजही मी त्यासाठी खूपच लाजिरवाणे वाटून घेतो.”

दरम्यान लवकरच सलमान खानचा किसी का भाई किसी की जान सिनेमा प्रदर्शित होणार असून, टायगर ३ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

वयाच्या 15 व्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण, लग्न करताना धर्मांतर करून आयशा टाकियाने केले सर्वाना आश्चर्यचकित

हे देखील वाचा