बॉलिवूडचा भाईजान अर्थात सौपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे आणि त्याला मिळालेल्या धमकीमुळे तुफान गाजत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईंने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सतत सलमान खानबद्दल विविध न्यूज येत आहेत. नुकतेच नीता मुकेश अंबानी कल्चरल इवेंटला बॉलिवूडमधील सर्वच स्टार्स उपस्थित होते, यात सलमान खान देखील होता. या कार्यक्रमानंतर जी प्रेस कॉन्फरन्स झाली तिथे सलमान होता. यामध्ये त्याला मिळालेल्या धमकीबद्दल त्याने काही उत्तरं दिली.
या कॉन्फरन्समध्ये त्याला विचारले गेले की, या धमक्यांबद्दल तुला काय वाटते? यावर तो म्हणाला, यावर त्याने अतिशय मजेदार उत्तर दिले, जे ऐकून सर्वांनाच हसायला आले. या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, “मी सर्वांचाच भाऊ नाही, मी काहींचा भाऊ तर काहींची जान आहे.” या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने त्याच्या आगामी सिनेमाचे प्रमोशन देखील केले आहे. सलमान खानला मिळालेल्या या धमकीनंतर त्याला मोठी सुरक्षा देण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोईंकडून सलमान खानला धमक्या मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तर त्याने दबंग खानला खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानने काळ्या हरणाची शिकार केल्याचा बिश्नोईंला राग आहे, म्हणून त्याने सलमानला माफी मागण्याची अथवा मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणात सलमान खानला सतत धमक्या मिळत आहे.
दरम्यान लवकरच सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात दिसणार असून, हा सिनेमा ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तो त्याच्या बहुप्रतिक्षित टायगर ३ मध्ये देखील दिसेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार
‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…