Sunday, July 21, 2024

सलमान खानला पुन्हा मिळाली धमकी, थेट पोलिसांनाच फोन करत सांगितली मारण्याची तारीख

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईंकडून धमकी मिळायचे एव्हाना सर्वांनाच माहित आहे आहे. या धमकीनंतर त्याला धमक्या मिळण्याचा वेग तसेच सुरु आहे. आता पुन्हा एकदा सलमान खानला अजून एक धमकी मिळाली आहे. ही धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो सलमानला कधी मारणार हे देखील सांगितले आहे. सदर व्यक्तीने तो सलमान खानला ३० एप्रिल रोजी मारेल असे सांगत स्वतःचे नाव त्याने रॉकी भाई सांगत तो गोरक्षक असल्याचे सांगितले.

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला १० एप्रिलला रात्री ९ वाजता आला होता. यानंतर पोलिसांमध्ये एकच गोंधळ झाला. सध्या मुंबई पोलीस या आलेल्या फोनची चौकशी करत आहे. या फोनची चहुबाजूनी चौकशी करत त्या कॉलरपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.

याआधी सलमान खानला एका मोठ्या चॅनेलला मुलाखत देताना लॉरेन्स बिश्नोईंने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावेळी तो म्हणाला होता की, त्याच्या जीवनाचे लक्ष सलमानला मारणे एवढेच आहे. त्याच्या भागात जाऊन सलमान खानने काळ्या हरिनाची शिकार केल्याचा राज बिश्नोईंच्या मनात आहे. यासाठीच त्याला सलमानला मारायचे आहे. त्याने सलमानला बिकानरेमधील एका मंदिरात येऊन माफी मग अन्यथा परिणाम वाईट होतील इतक्या स्पष्ट शब्दात धमकी दिली आहे. गोल्डी भाईंकडून देखील त्याला धमकीचा एक मेल करण्यात आला आहे.

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्याने देखील स्वतःच्या सुरक्षेसाठी एक बुलेटप्रूफ महागडी गाडी घेतली आहे. दरम्यान सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी जान’ सिनेमामुळे चांगलाच गाजत असून, नुकताच सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ईदच्या निमित्ताने हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

वयाच्या 15 व्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण, लग्न करताना धर्मांतर करून आयशा टाकियाने केले सर्वाना आश्चर्यचकित

हे देखील वाचा