Wednesday, July 3, 2024

शाहरुख खानपूर्वी ‘भाईजान’ सलमान खानला ऑफर झाला होता ‘चक दे इंडिया’, चित्रपट नाकारण्यामागे होते ‘हे’ कारण

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आज बॉलिवूड मधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. जेव्हा शाहरुख खानच्या कारकीर्दीबद्दल विषय निघतो, तेव्हा त्याच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाचा उल्लेख केला जातो. या चित्रपटाने त्याला एक वेगळीच ओळख मिळाली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका देखील वेगळी होती. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात होते. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का? शाहरुख खानच्या आधी हा रोल एका वेगळ्या अभिनेत्याला दिला होता, पण त्याने तो नाकारला. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की, तो नक्की कोणता अभिनेता होता ज्याने एवढा चांगला रोल नाकारला होता.

‘चक दे इंडिया’ या चित्रपटासाठी कोचच्या भूमिकेसाठी सुरुवातील ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खानला हा रोल दिला होता. पण त्याने तेव्हा हा चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता. सलमान खानच्या ‘सुलतान’ या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी जेव्हा त्याला ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट का नाकारला? असा प्रश्न विचारला होता, तेव्हा त्याने अगदी मजेशीर अंदाजात या प्रश्नाचं उत्तर दिले होते. त्याने हा सांगितले की, “मी हा चित्रपट यासाठी नाकारला कारण मला वाटतं होते की, शाहरुख खानच्या वाट्याला देखील जरा चांगले चांगले चित्रपट यावे.”

सलमानने दिलेल्या या उत्तरावर तेथे उपस्थित सर्वजण खूपच हसले होते. पण मजा- मस्ती बाजूला ठेवून सलमान खानने उत्तर दिले की, “त्यावेळी मी पार्टनर हा चित्रपट केला होता. चक दे इंडिया मधील एकही गुण माझ्यात नव्हते. त्यावेळी या चित्रपटात मी नीट काम करू शकलो नसतो. कारण मी त्यावेळी कमर्शिअल चित्रपट करत होतो. आणि चक दे इंडिया हा एक सीरियस कथेचा चित्रपट होता. त्यामुळे मी त्यात फिट झालो नसतो. आताही मी अनेक कमर्शिअल चित्रपट करतो पण यातही अनेक अर्थपूर्ण चित्रपट बनत आहेत.”

‘चक दे इंडिया’ हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये हॉकी हा खेळ दाखवला गेला होता. एका वेगळ्या विषयावर बनलेल्या या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळाली होती. हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वात जास्त कमाई केलेला चित्रपट होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कॅन्सरशी लढत असलेल्या अभिनेत्री किरण खेर कोरोना रुग्णांच्या मदतीला, व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी दिले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

-अक्षय कुमारनंतर आता पत्नी ट्विंकल खन्नाही आली कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून, थेट यूकेवरून मागवणार १०० ऑक्सिजन कंसंट्रेटर्स

-‘वयाच्या १२ व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, म्हणत अभिनेत्री इलियाना डिक्रूजने केले भाष्य

हे देखील वाचा