Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

केआरकेने पुन्हा साधला सलमान खानवर निशाणा; म्हणाला, ‘मी तुला सोडणार नाही…

मागील काही दिवसांपासून सलमान खान आणि केआरके म्हणजे कमाल राशिद खान यांच्यातील वाद खूप चर्चेत आहे. केआरके हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमान खानवर निशाणा साधत आहे. पुन्हा एकदा केआरकेने सोशल मीडियावर पोस्ट करून सलमान खानला सांगितले आहे की, त्याने कितीही प्रयत्न केले तरी तो सलमान खानला सोडणार नाही. त्याने सलमान खानला ‘भित्रा गुंड’ असे देखील संबोधले आहे.

कमालने सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले आहे की, “मी काही लोकांना ओळखत देखील नाही, जे माझ्या विरुद्ध बोलत आहेत. ते त्यांच्या अडाणी मालकाची भाषा वापरत आहेत. तू बॉलिवूडमधील असा एक भित्रा गुंड आहे ज्याला एक फ्लॉप गायक, एक मॉडेल आणि बिग बॉस मधील एका स्पर्धकांचा आधार घ्यावा लागला. तू खूप घाबरलेला आहे, पण आता तू माझ्या डोळ्यात आहेस. मी तुला सोडणार नाही मग तू कितीही प्रयत्न कर.”

त्यांनतर त्याने कोणाचेही नाव न घेता पुढे लिहिले की, “तुम्ही खरंतर काहीही किंमत नसलेली माणसं आहात.” या वादामध्ये गायक मिका सिंग आणि बिग बॉस स्पर्धक अली गोनीने सलमान खानला सपोर्ट केला होता.

सलमान खानने केआरके विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. यावर केआरके असं म्हणत आहे की, त्याने राधे या चित्रपटावर चुकीचा रिव्ह्यू दिल्याबद्दल सलमान खानने ही केस केली आहे. परंतु सलमान खानच्या टीमने खुलासा करत ही गोष्ट चुकीची सिद्ध केली होती. त्याच्या टीमने सांगितले की, त्यांनी केआरके विरोधात यामुळे तक्रार दाखल केली कारण त्याने सलमान खानला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याने सलमान खानला भ्रष्ट सांगितले. त्याची कंपनी बिइंग ह्युमनवर पैशाच्या अफलातफलीचा आरोप लावला होता.

यानंतर सलमान खानची बाजू घेत गायक मिका सिंगने त्याच्यावर निशाणा साधला होता. त्याने म्हटले होते की, “मी हैराण आहे की, सलमान भाईने त्याच्या विरोधात केस करण्यासाठी एवढा वेळ का लावला. अशा गाढवांना जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर शिकवण दिली पाहिजे. तो नेहमीच वैयक्तिक टिपण्णी करतो, हे खूप चुकीचे आहे. केआरके एवढा मोठा उंदीर आहे ना की, ती त्याच्या बिळातून अजिबात बाहेर निघत नाही. त्याला लवकरच उत्तर दिले पाहिजे.”

यांनतर केआरके, मिका सिंग आणि सलमान खान यांच्यावर वारंवार टीका करताना दिसत आहे. मिका सिंग देखील सोशल मीडियावर शब्दाच्या रुपात केआरकेला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा