Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड जुन्या आणि जिवलग मैत्रिणीसाठी सलमानने केलं असं काही की सगळेच म्हणाले, ‘भाईजान तो भाईजान है’

जुन्या आणि जिवलग मैत्रिणीसाठी सलमानने केलं असं काही की सगळेच म्हणाले, ‘भाईजान तो भाईजान है’

बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री कतरिना कैफ हीची बहीण इसाबेल कैफ,  एका नव्या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. दिनांक १२ मार्च रोजी नेटफिल्क्सवर तिचा पहिला सिनेमा प्रदर्शीत होत आहे. याच सिनेमात इसाबेलसह सुरज पांचोली हा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नुकताच इसाबेलचा या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शीत झाला. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान याने या सिनेमाचा ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन प्रसिद्ध करत कतरिनाच्या बहिणीला तिच्या आगामी काळातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इसाबेल कैफची भुमिका असलेल्या या सिनेमाचे नाव आहे ‘टाइम टू डान्स’. याच सिनेमाच्या ट्रेलरला पोस्ट करत सलमानने त्याची जवळची आणि जुनी मैत्रिण कतरिनाला एक प्रकारे गिफ्ट दिलं आहे. हिंदी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन कलाकार एन्ट्री घेत असतात. यावर्षीही अनेक कलाकारांनी सिनेजगतात पाऊल ठेवले, इसाबेल कैफ ही त्यापैकीच एक आहे.

सलमान खान नेहमीच नवीन कलाकरांना इंडस्ट्रीमध्ये आणत असतो. त्याने आतापर्यंत अनेक अभिनेते, अभिनेत्री, गायक, गायिका, संगीतकार आदींना या क्षेत्रात उतरण्यासाठी आणि टिकण्यासाठी सहाय्य केले आहे.

आता ‘टाइम टू डान्स’ या सिनेमाच्या निमित्ताने इसाबेल या क्षेत्रात पदार्पण करत आहे. आणि ती सलमान खानची मैत्रीण कतरिनाची बहीणही आहे. त्यामुळे तिच्या आगामी सिनेमाला शुभेच्छा देत, सलमानने या सिनेमाचा ट्रेलर शेयर केला आहे. त्याने यावेळी पोस्टमध्ये लिहिले देखील आहे की, “टाइम टू डांस सिनेमाच्या टीमला शुभेच्छा.”

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा याची पत्नी लिजेल डिसूजा हीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच इसाबेल आणि सुरज पांचोलीसोबतच या सिनेमात वलुस्चा डिसूजा आणि राजपाल यादव महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे देखील वाचा