Monday, July 8, 2024

आई, आई असते! भाईजान सलमान खानने केला आईच्या कुशीत बसलेला हा फोटो शेअर, म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा एक अभिनेता असण्यासोबतच एक फॅमिली मॅन देखील आहे. अनेकांना ही गोष्ट माहीत आहे की, सलमान खान त्याच्या कुटुंबावर किती प्रेम करतो. तसेच तो त्याच्या कुटुंबासाठी खूप जास्त प्रोटेक्टिव आहे. तो कितीही कामात व्यस्त असला, शूटिंगमध्ये जरी असला तरी देखील त्याच्या कुटुंबासाठी तो नेहमीच वेळ काढत असतो. त्याचे त्याच्या कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडिओ नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. अशातच नुकतेच सलमानने सोशल मीडियावर त्याची आई सलमा खानसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या आईसोबत वेळ घालवता ना दिसत आहे.

सलमान खानने (salman khan) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या आईसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सलमान त्याच्या आईच्या कुशीत आरामात बसलेला दिसत आहे. यावेळी त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एक गोड स्माईल दिसत आहे. (Salman Khan share a photo with her his mother Salma Khan on social media)

हा फोटो शेअर करून करून सलमान खानने अगदी छोटे परंतु एक खास कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “आईच्या कुशीत.” त्याचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खानचा त्याच्या आईसोबत हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण त्याच्या या पोस्टवर त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो या आधी ‘अंतिम’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याचा दाजी आयुष शर्मा देखील होता. या दिवसात तो ‘टायगर ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. तसेच तो ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा