Sunday, June 8, 2025
Home अन्य ‘बिग बॉस १५’च्या मंचावर रणवीर सिंगला पाहून सलमान खान चकित; म्हणाला, ‘कलर्सची तर…’

‘बिग बॉस १५’च्या मंचावर रणवीर सिंगला पाहून सलमान खान चकित; म्हणाला, ‘कलर्सची तर…’

टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित शो ‘बिग बॉस’चे पंधरावे पर्व शनिवारपासून (२ ऑक्टोबर) सुरू होणार आहे. या शोच्या ग्रँड प्रीमियरची सगळी तयारी झाली आहे. आज मंचावर प्रेक्षकांना एक नाही, तर दोन-दोन कलाकारांचा स्वॅग पाहायला मिळणार आहे. दर वर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा शो सुपरस्टार सलमान खान होस्ट करणार आहे. या वेळी त्याच्यासोबत ग्रँड प्रीमियरला रणवीर सिंग चार चाँद लावणार आहे.

बिग बॉस १५ च्या ग्रँड प्रीमियरला आता अगदी काहीच तास उरले आहेत. कलर्स चॅनेलवरून या शोचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पर्धकांमध्ये बिग बॉस १५ च्या मंचावर रणवीर सिंग देखील दिसत आहे. (Salman Khan shocked to see Ranveer singh on stage of bigg Boss 15 )

सलमान खानने जेव्हा बिग बॉस १५ च्या मंचावर रणवीर सिंगला पाहिले, तेव्हा तो हैराण झाला. दरम्यान रणवीर सिंग सलमानला म्हणतो की, “तो टीव्हीवरील एक अनोखा क्विझ शो होस्ट करत आहे.” यावर सलमान खान विचारतो की, “हे दोन्ही सोबतच चालू होणार आहेत का? कलर्सची तर मजाच आहे.” यावर रणवीर त्याला “हो सर,” असे उत्तर देतो.

कलर्सने हा प्रोमो शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “जेव्हा भारतातील दोन सुपरस्टार एका मंचावर येतील, तेव्हा ग्रँड प्रीमियरची रात्र खास होईल. ‘बिग बॉस १५’ चे ग्रँड प्रीमियर आज रात्री ९: ३० वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्री १०: ३० वाजता फक्त कलर्सवर.”

रणवीर सिंग हा त्याचा आगामी शो ‘द बिग पिक्चर’च्या प्रमोशनसाठी आला होता. या शोमधून तो टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. त्याचा हा शो १६ ऑक्टोबरपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता टेलिकास्ट होणार आहे, तर दुसरीकडे ‘बिग बॉस’मध्ये दर शनिवारी आणि रविवारी सलमान सगळ्या सदस्यांचा क्लास घेताना दिसणार आहे.

‘बिग बॉस १५’ हा शो २ ऑक्टोबर रात्री ९: ३० वाजता कलर्स चॅनलवर दाखवला जाणार आहे. तसेच हा शो वूटवर देखील बघता येणार आहे. तसेच जीओ टीव्हीवर देखील या शोचे प्रसारण पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

-शर्टची बटणं खोलून साराने हॉट फोटो केले शेअर, तिच्यावरून नजर हटविणंही झालंय कठीण

-‘ही पाहा ऍटिट्यूडवाली आंटी…’, करीनाचे उद्धट वागणे पाहून नेटकऱ्यांची सुनावले तिला चांगलेच खडेबोल

हे देखील वाचा