‘बिग बॉस’ला देशातील सर्वात मोठा आणि वादग्रस्त रिय़ॅलिटी शो म्हटले जाते. अशा आता ‘बिग बॉस १६’ ची तयारी सुरू झाली आहे. ‘बिग बॉस’ला पसंत करणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. चाहते दरवर्षी या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. सलमान खान (Salman Khan) त्याच्या होस्टिंग स्टाईलने हा शो आणखी मनोरंजक बनवतो. सुरुवातीचे काही सीझन सोडले, तर सलमानचा सतत हा शो होस्ट करताना दिसतो. शोचे १५ सीझन पूर्ण झाले आहेत, आता ‘बिग बॉस’ एक नवीन चॅप्टर घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र, त्यासाठी चाहत्यांना आता थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘या’ महिन्यात सुरू होईल शो
सलमान खानचे प्रेक्षकांशी एक वेगळे नाते आहे. ‘बिग बॉस १६’मध्ये एक नवीन संकल्पना पाहायला मिळणार आहे. यावेळी निर्मात्यांनी आतापासूनच हा शो टीआरपीच्या टॉप लिस्टमध्ये कसा येईल, याची तयारी सुरू केली आहे. ताज्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’चा नवीन सीझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. हा शो दरदिवशी रात्री १०.३० वाजता प्रसारित केला जाईल आणि वीकेंडला रात्री ९ वाजता दाखवला जाईल. तर सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत दिव्यांका त्रिपाठीचे (Divyanka Tripathi) नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. (salman khan show bigg boss 16 could be on air from october here is contestants name list)
स्पर्धकांची नावे समोर आली
रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी अभिनेत्रीला ‘बिग बॉस’साठी संपर्क साधला आहे. दिव्यांका व्यतिरिक्त जे नाव समोर आले आहे, ते म्हणजे जन्नत जुबैर (Jannat Zubair). यासोबतच माही विज (Mahhi Vij) आणि शिवांगी जोशी (Shivangi Joshi) यांनाही शोसाठी ऑफर देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. निर्मात्यांनी प्रेक्षकांना वचन दिले आहे की, त्यांना शोमध्ये आणखी ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळतील. अहवालानुसार, स्पर्धकांना दोन संघांमध्ये विभागले जाऊ शकते, जे ट्रॉफी जिंकण्यासाठी लढताना दिसतील.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा