Saturday, November 23, 2024
Home मराठी रस्त्यात रडत असलेल्या छोट्या अर्पिताला खान कुटुंबाने घेतलं होतं दत्तक! सलमानची लाडकी बहीण म्हणून ओळखलं जातं फिल्मजगतात

रस्त्यात रडत असलेल्या छोट्या अर्पिताला खान कुटुंबाने घेतलं होतं दत्तक! सलमानची लाडकी बहीण म्हणून ओळखलं जातं फिल्मजगतात

बॉलीवूडच्या भाईजानचं संपूर्ण कुटुंबच चित्रपट उद्योगाचा भाग आहे. जिथे सलमान बॉलीवूडचा सुपरस्टार आहे, तिथे अरबाज आणि सोहेल खान अभिनेत्यासह चित्रपट निर्माते देखील आहेत. सलीम खान बॉलीवूडचे एक मोठे प्रसिद्ध लेखक आहे. त्यांच्या सलमा खान आणि हेलन या दोन पत्नी आहेत. त्याच वेळी मुली अलविरा, अर्पिता खान आहेत ज्या चित्रपटांकडे फारश्या वळत नाहीत परंतु चर्चांमध्ये कायम असतात.

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानची बहीण अर्पिता दत्तक घेण्यात आली आहे, ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अर्पिताला दत्तक घेतलं. खरं तर, सलीम खान दररोज भीक मागत असणार्‍या एका महिलेला जेवण देत असत. तिची एक लहान मुलगीही तीच्याबरोबर राहत होती.

नेहमीप्रमाणे सलीम खान एक दिवस त्या बाईला जेवण द्यायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या बाईचं निधन झालं आहे आणि तिची लहान मुलगी रस्त्यावर एकटीच रडत आहे. सलीम यांना ते दृश्य पाहवलं नाही आणि ते अर्पिताला आपल्या घरी घेऊन गेले. आज अर्पिता खान कुटुंबातील सर्वांची आवडती लेक आहे. सलमानचा तर अर्पितावर विशेष जीव आहे. अर्पिता आज ३१ वर्षांची असून तीच लग्न बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा याच्याशी झालं आहे तर त्यांना अहिल हा मुलगा तर आयत ही मुलगी देखील आहे.

अर्पिता खानबद्दल बोलायचं झालं तर, तिने मुंबईतून सुरुवातीचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने लंडन स्कूल ऑफ फॅशनमध्ये फॅशन डिझाईनिंग हा कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतला. लंडनला अभ्यास केल्यानंतर अर्पिता मुंबईला परत आली तेव्हा तिने मुंबईतील एका इंटीरियर डिझायनर फर्ममध्ये नोकरी केली. अर्पिताचं संपूर्ण कुटुंब चित्रपट उद्योगाशी जोडलेलं आहे, परंतु अर्पिता स्वतःला मात्र बॉलीवूडपासून दूर ठेवते.

२०१४ मध्ये अर्पिताचा अभिनेता आयुष शर्माशी विवाह झाला. आयुष हिमाचल प्रदेशच्या सर्वात प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाशी संबंधित आहे. त्याचे आजोबा केंद्रीय मंत्री होते आणि हिमाचलमध्ये टेलीकॉम क्रांती आणण्यासाठी त्यांनाच श्रेय दिलं जातं. त्याच वेळी, त्याचे वडील अनिल शर्मा एक वरिष्ठ काँग्रेस नेते आहेत. लग्नानंतर अर्पिता-आयुष खूप आनंदी आयुष्य जगत आहेत शिवाय सोशल मीडियावर त्यांच्या दोन्ही मुलांचे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा