Monday, July 1, 2024

निधनापूर्वी सतीश कौशिक करत होते ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची तयारी सलमान खानने केला खुलासा

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे महिनाभरापूर्वी अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अजूनही त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून इंडस्ट्री बाहेर आलेली नाही. सतीश कौशिक यांचा जवळचा मित्र म्हणून सलमान खानला ओळखले जाते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये सलमान खानने सतीश कौशिक आणि त्याच्यामध्ये झालेल्या एका संवादाबद्दल सांगितले.

सलमान आणि सतीश यांच्यामध्ये खूपच चांगले नाते होते. सलमान खानच्या करियरमधला सर्वात मोठा हिट सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘तेरे नाम’चे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी सतीश यांनी त्यांच्या निधनाच्या आधी सलमान खानशी ‘तेरे नाम २’बद्दल चर्चा केली होती. किसी का भाई किसी की जान सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणाऱ्या सलमान खानने सांगितले की, त्याला २० वर्षांपूर्वी सतीश यांनी तेरे नाम सिनेमाची कथा आणि पूर्ण प्लॉट केवळ एका लाइनमध्ये सांगितला होता. त्याला ते खूपच आवडले होते. सतीश यांच्या निधनाच्या आधी त्यांनी अरबाज खानच्या एका सिनेमावर काम केले होते आणि लवकरच ते अजून एका प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात करणार होते.

सलमानने हे देखील सांगितले की, त्यांनी तेरे नाम सिनेमाच्या सिक्वलच्या प्लॉटवर चर्चा केली होती. ते लवकरच या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु करणार होते. सलमानने यावर हे देखील सांगितले की, तो नक्कीच भविष्यात या सिनेमाचा सिक्वल बनवेल.

दरम्यान तेरे नाम हा सिनेमा तुफान गाजला. सिनेमातील गाणी आजही लोकांना आवडतात. या सिनेमाने सलमान खानच्या करियरला मोठे आणि चांगले वळण दिले. सलमान खानची सिनेमातील हेयर स्टाइल आजही प्रसिद्ध आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रेट्रो मूड ऑन करणारे ‘फकाट’मधील “तुझी माझी जोडी” प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खान का घालताे फाटलेले बूट? ‘या’ कलाकारांनी केला धक्कादायक खुलासा, वाचा संपुर्ण प्रकरण

हे देखील वाचा