सलमान खानला (Salman Khan) मिळालेली जीवे मारण्याची धमकी, हा सध्या मुंबई पोलिसांसाठी चिंतेचा विषय आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी सलमान खानची चौकशीही केली आहे. मुंबई पोलिसांना सलमान खानकडून जाणून घ्यायचे आहे की, त्याला कोणावर संशय आहे का, त्याला यापूर्वी अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत का? पोलिसांनी सलमान खानची काय चौकशी केली आणि त्याने उत्तरात काय सांगितले, यासंबंधी काही तपशील जाणून घेऊयात.
पोलिसांनी विचारले की, अलीकडच्या काळात त्याला कोणाचा धमकीचा कॉल, मेसेज आला होता का? किंवा त्याचा कोणाशी वाद झाला होता का? सलमान खानने या प्रश्नाचे उत्तर दिले आणि सांगितले की, अलीकडेच्या काळात त्याचा कोणाशीही वाद झालेला नाही. तसेच त्याला धमकीचा कॉल आलेला नाही आणि असा कोणताही मेसेज आलेला नाही. (salman khan threat letter case update)
यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला या धमकीच्या पत्राबद्दल काही शंका आहे का, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना सलमान खान म्हणाला की, हे पत्र त्याला मिळालेले नाही. त्याचे वडील सलीम खान (Saleem Khan) मॉर्निंग वॉक करताना खुर्चीवर बसतात आणि त्या ठिकाणी अनेक लोक पत्र लिहून निघून जातात. त्याच ठिकाणी त्यांना हे पत्र मिळाले आहे. तसेच माझ्याकडे कोणावरही संशय घेण्याचे कोणतेही ठोस कारण नाही, असेही तो म्हणाला.
मुंबई पोलिसांनी विचारले की, गोल्डी बरार किंवा लॉरेन्स बिश्नोई यांना किंवा त्यांच्या टोळीतील कोणाला सलमान खान ओळखतो का? याला उत्तर देताना सलमान खान म्हणाला, “मला गोल्डी बरारबद्दल माहिती नाही. पण काही वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणामुळे मी लॉरेन्स बिश्नोईला इतरांइतकाच ओळखतो.”
काय प्रकरण आहे?
रविवारी (५ जून) बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. त्यानंतर बॉलिवूडपासून ते मुंबई पोलिस टेंशनमध्ये आले आहेत. जेव्हा सलमान खानचे वडील सकाळी जॉगिंगसाठी गेले, तेव्हा ते बेंचवर बसले होते. तेव्हा त्यांना एक पत्र सापडले, ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली. या पत्रात सलमान खानलाही सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) करणार असल्याचे लिहिले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा