Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड तब्बल ३६ वर्षांपूर्वी ‘या’ जाहिरातीत दिसला होता ‘भाईजान’; हँडसम लूक पाहून चाहते नव्याने पडतायेत प्रेमात

तब्बल ३६ वर्षांपूर्वी ‘या’ जाहिरातीत दिसला होता ‘भाईजान’; हँडसम लूक पाहून चाहते नव्याने पडतायेत प्रेमात

बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. संपूर्ण जगात त्याने त्याच्या लूक्सने, अभिनयाने, डान्सने, बॉडीने अमाप फॅन फॉलोविंग तयार केली आहे. आज त्याच्या फक्त नावावर सिनेमे हिट होत आहेत. इतकी तगडी आणि जबरदस्त फॅन फॉलोविंग तिच्याकडे आहे. बऱ्याचदा इतर कलाकरांना देखील त्याच्या फॅन्सचा हेवा वाटतो. पन्नाशी पार करूनही त्याची लोकांमधील क्रेझ यत्किंचितही कमी झाली नाहीये. उलट दिवसागणिक त्यात सतत भर पडत आहे. मागील बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याचा ट्रेंड जोरावर आहे. अनेक कलाकार या ट्रेंडनुसार त्यांचे थ्रॉबक फोटो, व्हिडिओ पोस्ट करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर सलमानचा असच एक जुना व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

सलमानचा व्हायरल होणारा व्हिडिओ हा एका जाहिरातीचा आहे. या व्हिडिओमध्ये सलमान हिरो होंडाची जाहिरात करताना दिसत असून, तो खूपच तरुण आणि हँडसम दिसत आहे. हिरो होंडाची बाईक चालवणाऱ्या सलमानने आतासारखेच त्या काळातही लोकांना वेड लावले होते. या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसणारा सलमान चांगलाच आकर्षक आणि कॉन्फिडन्ट वाटत आहे. ही जाहिरात १९८५ सालातील असून, तेव्हा सलमानने चित्रपटांमध्ये पदार्पण देखील नव्हते केले. मात्र, आजही ही जाहिरात पाहून नेटकरी त्याच्यावर चांगलेच फिदा झाले आहेत. या व्हिडिओवर तशा कमेंट्स देखील येत आहेत. (salman khan through back video)

आजही सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर हजारो लोकांची गर्दी जमते. तरुणीचं काय, तरुण मुलंदेखील त्याच्यासाठी वेडे आहेत. त्याला इंडस्ट्रीमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हटले जाते, आणि का नाही तो आहेच तसा. त्याच्या फॅन्सच्या यादीत सामान्य लोकंच नाही, तर अनेक दिग्गज अभिनेते, अभिनेत्रींचा समावेश आहे. सलमानचे नाव आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. मात्र, कोणत्याही अभिनेत्रीसोबतचे त्याचे नाते लग्नात रूपांतरित झाले नाही.

आज सलमान ब्रँड आहे. त्याचे फ्लॉप सिनेमे देखील १०० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय करतात. यावरूनच कल्पना करता येईल की, त्याची फॅन फॉलोविंग किती जबराट आहे. सध्या सलमानच्या हातात अनेक मोठमोठे सिनेमे आहेत. तो आता कॅटरिनासोबत ‘टायगर ३’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, सोबतच टेलिव्हिजनवर बिग बॉस १५ सोबत देखील काम करत आहे. मागील अनेक पर्वांपासुन सलमान हा शो होस्ट करताना दिसत आहे. आता आगामी १५ व्या पर्वात देखील पुन्हा सलमान त्याच्या सूत्रसंचालनाने शोला चार चाँद लावणार हे नक्की.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा