Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड शत्रुत्व विसरून सलमान खान ‘या’ दिग्दर्शकासोबत दिसणार एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये

शत्रुत्व विसरून सलमान खान ‘या’ दिग्दर्शकासोबत दिसणार एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये जसे त्याचे अनेक मित्र आहेत. तसेच अनेकजण त्याचे शत्रू देखील आहे. जर त्याने एखाद्याशी दुश्मनी घेतली तर त्याच्यासोबत मैत्री लांबच पण काम न करण्याची देखील इच्छा ठेवत नाही. त्याच्या दुष्मनांच्या यादीतील एक नाव म्हणजे संजय लीला भन्साळी होय. परंतु अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे की, सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांची मैत्री झाली आहे आणि ते एकत्र एका प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत.

माध्यमातून मिळालेल्या वृत्तानुसार, दोन्ही कलाकार सलमान खानवर एक डॉक्युमेंट सीरिज ‘बियॉंड द स्टार’ साठी एकत्र येणार आहेत. ही सीरिज ओटीटीवर एका लोकप्रिय कंपनीसाठी बनवली जात आहे. या प्रोजेक्टची निर्मिती सलमान खान फिल्म्स, वीज फिल्म्स आणि अप्लोज एंटरटेमेंटद्वारे केली जाणार आहे. (Salman Khan to feature director Sanjay Leela Bhansali forgot old fudges and work together for new project)

यामध्ये सलमान खानच्या आयुष्याची कहाणी दाखवली जाणार असून, अशी चर्चा चालू आहे की, या सीरिजमध्ये संजय लीला भन्साळी देखील दिसणार आहे. यासाठी बाकी अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांना अप्रोच केले होते. संजय त्यामधीलच एक आहे ज्यांनी या प्रोजेक्टसाठी होकार दर्शवला होता. यामधून हे साफ दिसत आहे की, त्यांच्यात मैत्री वाढत आहे.

माध्यमातून मिळालेल्या वृत्तानुसार, भन्साळीने या सीरिजमध्ये त्याच्या शूटिंगचा पार्ट पूर्ण केला आहे. असे म्हटले जाते की, सलमान खानसोबत मैत्री आणि प्रेमासोबत भन्साळीने त्याच्या काही वैयक्तिक गोष्टी देखील शेअर केल्या आहेत. ज्या गोष्टी प्रेक्षकांना माहित नाहीये. ज्या त्यांना या नवीन प्रोजेक्टमधून अनुभवायला मिळणार आहेत. परंतु या बाबत त्यांनी अजूनही कोणतीच अधिकृत घोषणा केली नाही.

या आधी देखील अनेकवेळा अशी चर्चा झाली आहे की, संजय लीला भन्साळी आणि सलमान खान ‘इंशाल्लाह’ हा चित्रपट बनवणार आहेत. परंतु चित्रपट सुरू होण्याआधीच त्याच्या चर्चा बंद झाल्या. आता जवळपास २१ वर्षानंतर ते दोघे एकत्र काम करणार होते परंतु या मधेच अशा बातम्या येऊ लागल्या होत्या की, सलमान आणि संजयमध्ये काही ठीक चालले नाही आणि काही मतभेदांमुळे हा चित्रपट होऊ शकला नाही.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो त्याच्या आगामी चित्रपट ‘अंतिम : द फायनल त्रुथ’ चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच त्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

 

हे देखील वाचा