Saturday, June 29, 2024

जेव्हा कलाकाराच्या निधनामुळे चाहत्यांनी ‘या’ सेलेब्सला धरले होते धारेवर; सलमानपासून रश्मीपर्यंत अनेकांचा आहे समावेश

गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. काही कलाकारांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे चाहते चकित झाले आहेत. यावर फक्त चाहतेच नाही, तर इतर बाॅलिवूड कलाकारही स्तब्ध झाले आहेत. दरम्यान, अनेक कलाकारांनी या दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, या पोस्टमुळे अनेकांना ट्रोल देखील केले जाते आहे. एक किंवा दोन वेळा असे झाले नाही, तर अनेक वेळा असे घडले आहे. एका कलाकाराच्या मृत्यूनंतर अनेक चाहते भडकले.

महेश भट्ट
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चित्रपट निर्माते महेश भट्ट हे ट्रोलिंगचे शिकार झाले होते. दरम्यान, सुशांतने आत्महत्या केली होती आणि याचे कारण नैराश्य असल्याचे सांगितले गेले होते. त्यानंतर महेश भट्ट म्हणाले होते की, “सुशांतला भेटूनच तो परवीन बाबीच्या मार्गावर आहे, हे त्याला कळाले होते.” सुशांतच्या चाहत्यांनी याबद्दल महेश भट्ट यांना खूप ट्रोल केले.

साजिद नाडियाडवाला
चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी अभिनेत्री दिव्या भारतीसोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या एका वर्षाच्या आतच दिव्याचा तिच्याच फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांनी साजिदवर अनेक प्रश्न उपस्थित केले. काही चाहते असे म्हणत होते की, या अपघातात साजिदचा हात आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांना कोणाविरोधातही पुरावे न मिळाल्याने हे प्रकरण जागीच बंद करण्यात आले.

रिया चक्रवर्ती
अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव बॉलिवूडमध्ये इतके प्रसिद्ध नव्हते, पण सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. दरम्यान, सुशांतच्या चाहत्यांचा असं वाटत होतं की, सुशांतने त्याची गर्लफ्रेंड रियाशी भांडणानंतरच फाशी घेतली. तर तिच्यावर सुशांतचे पैसे हडप करण्याचा आणि जबरदस्तीने ड्रग्स दिल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे रियाला बराच काळ ट्रोल केले गेले.

सूरज पांचोली
अभिनेत्री जिया खाननेही वयाच्या २५ व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून मीडियामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या होत्या, ज्यात जियाची प्रेमात फसवणूक झाल्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात होते. तसेच तिच्या प्रेग्नेंसीवरही बरेच प्रश्न उपस्थित केले गेले, त्यानंतर सूरज पांचोलीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. चाहत्यांना वाटत होतं की, सूरजमुळेच जियाने हे पाऊल उचलले असावे.

बोनी कपूर
श्रीदेवींचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. श्रीदेवी अचानक आपल्यातून निघून जातील, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती बोनी कपूर यांना अनेक प्रश्नांच्या गोत्यात टाकण्यात आले. बोनी कपूर हेच श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण आहेत, असे सांगून सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले.

सलमान खान
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात अनेक कलाकार त्याची खिल्ली उडवताना दिसले. त्याचवेळी सलमानवर असाही आरोप करण्यात आला की, तो सुशांतला इंडस्ट्रीत पुढे जाऊ देत नव्हता, त्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.

रश्मी देसाई
अलीकडेच, सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या निधनाची बातमी सर्वत्र वार्‍यासारखी पसरली आणि संपूर्ण चाहत्यांना धक्काच बसला. त्याच्या मृत्यूची बातमी बाहेर येताच त्याला ओळखणारे सर्व कलाकार त्याच्या घरी गेले होते. त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रश्मी देसाई देखील सिद्धार्थच्या घरी गेली होती.

मात्र, ‘बिग बॉस’ दरम्यान झालेल्या सिद्धार्थ आणि रश्मी यांच्यातील भांडणावरून चाहत्यांनी तिला खूप ट्रोल केले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा