ओटीटी हे माध्यम बऱ्याच काळापासून आहे, मात्र कोरोनाकाळात या माध्यमाला एक वेगळेच महत्व मिळाल्याचे दिसले. या काळात लोकांच्या मनोरंजनासाठी हे एकमेव माध्यम असल्याने याला एक वेगळी आणि मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. या माध्यमामार्फत वेबसिरीज, सिनेमे, विविध शो आदी अनेक गोष्टींचा आपण आनंद घेऊ शकतो. सध्या आणि आगामी काळात या डिजिटल प्लॅटफॉर्मला मिळणारे महत्व आणि लोकप्रियता बघता बॉलिवूड, टीव्ही यामध्ये काम करणाऱ्या बऱ्याच मोठ्या कलाकारांनी त्यांचा मोर्चा या क्षेत्राकडे वळवला आहे. काही फ्लॉप कलाकारांसाठी तर हे माध्यम वरदानच ठरले आहे. अशा या तुफान लोकप्रिय प्लॅटफॉर्मची भुरळ बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानला देखील पडली आहे.
हो लवकरच शाहरुख खान त्याचे डिजिटल पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. याचा एक हटके आणि मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. हाच व्हिडिओ सलमान खानने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सलमानने लिहिले, “स्वागत नाही करणार का शाहरुख खानचे?” तसे पाहिले तर सलमान आणि शाहरुख या दोघांची जोडी फॅन्सला तुफान आवडते. या दोघांचे फॅन्सदेखील नेहमीच सलमान आणि शाहरुखला एकत्र बघण्यासाठी आसुसलेले असतात.
शाहरुख लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टारवर त्याचा एक चित्रपट प्रदर्शित करणार आहे. आता तो सिनेमा कोणता?, कधी होणार प्रदर्शित? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच सर्वांना मिळणार आहे. तत्पूर्वी सलमानने शाहरुखचा हा व्हिडिओ पोस्ट करून त्याच्या या पदार्पणाला शुभेच्छा देत त्याला पाठिंबा दिला आहे
जेव्हा जेव्हा सलमान किंवा शाहरुख एकमेकांना सोशल मीडियावर प्रमोट करतात, एकमेकांबद्दल बोलताना दिसतात तेव्हा चर्चा तर व्हायलाच पाहिजे ना. या दोघांची मैत्री, दुश्मनी आणि पुन्हा मैत्री हे सर्वश्रुतच आहे. अनेकदा हे दोघे एकमेकांबद्दल बोलतात, एकमेकांच्या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारतात, स्टेजवर सोबत दिसतात. जेव्हा कधी या दोघांचा विषय येतो तेव्हा सगळ्यांचेच कान टवकारले जातात. आता सुद्धा शाहरुख डिजिटल माध्यमावर पदार्पण करणर असल्याचा व्हिडिओ सलमानने टायच्या अकाऊंटवरून शेअर करताच या व्हिडिओला दुप्पट प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे.
शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘पठाण’ या सिनेमात दिसणार असून, या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहे. शिवाय ‘पठाण’मध्ये सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या ‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…