Thursday, July 18, 2024

‘भाईजान’ची फिटनेस पाहून व्हाल थक्क; चाहते म्हणाले, ‘हँडसम जान’

सध्या दिवाळीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. भाऊबीज हा सण साजरा करत आहे. हा दिवस बहिण भावाचा असतो. या खास दिवशी अनेकजण आपल्या भावाविषयीचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. अशातच भाऊबिजच्या निमित्यानं सलमान खान(Salman Khan) याने फोटो शेअर करत भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते पाहून चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सल्लू मियाँ शर्टलेस पोज देताना दिसत आहेत. यादरम्यान सलमान खान शर्टशिवाय त्याचे सिक्स पॅक फ्लॉंट करत आहे आणि काळा गॉगल घालून स्टायलिश पोझ देत आहे. हा फोटो शेअर करत सलमानने भाऊबिजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

सलमान खानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा लूक फार आवडत आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, “मस्त रे बाबा.” दुसर्‍याने कमेंटमध्ये लिहिले की, “सलमान इज बॅक.” एकाने “एक नंबर भाऊ” अशी प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी दुसर्‍या यूजरने लिहिले, “हँडसम जान.” त्याचप्रमाणे लोकांना सलमान खानचा हा फोटो खूप आवडतो आहे.

यादरम्यान, सलमान खानचा त्याच्या बॅक टू बॅक चित्रपटांचा बोलबाला आहे. तो लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर 3’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. ‘टायगर 3’मध्ये त्याच्यासोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. त्याचबरोबर शहनाज गिल ते पलक तिवारीसारखे नवे स्टार्स ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये दिसणार आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त सलमान खान ‘बिग बॉस 16’ देखील होस्ट करत आहे. आता ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 2023 मधील ईदला सिनेमागृहात दर्शकांच्या भेटीला दाखल होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनेरी लेहेंगात केतकीचा खास लूक
खूप झालं आता! ‘ब्रम्हास्त्र’च्या प्रमोशनवरुन रणबीर कपूर संतापला, पाहा काय आहे प्रकरण?

हे देखील वाचा