Friday, July 5, 2024

नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी साजरा होणार ‘भाई का बड्डे’, अंतिम सिनेमातील नवीन गाण्याचा टिझर प्रदर्शित

सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा आगामी चित्रपट अंतिम-द फायनल ट्रुथ २६ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘विघ्नहर्ता’ हे पहिले गाणे महिनाभरापूर्वीच प्रदर्शित झाले होते. आता या चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या गाण्याचे बोल ‘भाई का बड्डे’ असे असून, या टीझरमध्ये आयुष गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. त्यामध्ये तो काही देसी मूव्हज दाखवत असून, सलमान खान पोलिसांच्या गणवेशात धमाकेदार एन्ट्री करताना दिसत आहे. दोघेही या गाण्यात जबरदस्त स्टाईलमध्ये दिसत आहेत.

‘अंतिम’ चित्रपटाचे नवीन गाणे ‘भाई का बड्डे’ एक पार्टी गाणे आहे. या गाणाच्या टिझरला खूप कमी वेळात लाखों व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून लक्षात येते की या गाण्याचा टिझर चाहत्यांना किती आवडला आहे. ‘अंतिम’ चित्रपटाचे हे नवीन गाणे १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, या गाण्यात पुन्हा एकदा साल्या मेहुण्याच्या जोडी पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात सलमान राजवीर सिंग या शीख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावताना दिसणार आहे, तर आयुष एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे. पहिल्यांदाच या दोघांची जोडी मोठया पडद्यावर बघायला मिळणार असल्याने त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

चित्रपटात त्या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील अभिनेत्री महिमा मकवाना या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ती या चित्रपटात आयुषसोबत दिसणार आहे, हा चित्रपट २६ नोव्हेंबरमध्ये रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने या गाण्याचा टिझर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत लिहिले, “१ नोव्हेंबर ही तारीख राखून ठेवा.’ सलमान खानच्या या सिनेमाची प्रतीक्षा मागील बऱ्याच काळापासून केली जात आहे. ‘अंतिम’ हा सिनेमा मराठीमधील ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात,धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

हे देखील वाचा