Tuesday, July 9, 2024

सलमान खानच्या कुटुंबीयांनी वाजत गाजत दिला दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप

सध्या सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले आहे. संपूर्ण देशात गणरायाचे आगमन झाले आहे. सर्व सामान्य व्यक्ती ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांच्याच घरी गणराया विराजमान झाला आहे. सर्वांनी उत्साहात गणरायाची स्वागत केले आहे. सर्वांनी घरी सजावट करून बाप्पाची प्रतिमा स्थापन केली आहे. परंतु काही जणांच्या घरी फक्त दीड दिवसांचा गणपती असतो. काही सेलिब्रिटींच्या घरी ही तसेच काहीसे असते.

अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता दरवर्षी गणेश चतुर्थीला तिच्या घरी गणपतीची मूर्ती स्थापन करते. ती गणरायाची भक्तीभावाने पूजा करते. यावर्षीही त्यांनी आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले. जरी दीड दिवसांच्या पूजेनंतर गणपती बाप्पाचे विसर्जन केले. परंतु आता तिच्या घराच्या आतल्या सजावटीचे काही फोटो सध्या समोर आली आहेत.

instagram.com/p/CTtoF74K9AS/

अर्पिताने ज्या पद्धतीने गणपती बाप्पासाठी निळ्या रंगाच्या फुलांनी सजावट केली होती. तिने केली ही सजावट खूपच सुंदर दिसत आहे. बाप्पासाठी केलेली ही अप्रतिम सजावट सोशल मीडियावर ही लोकांना खूप आवडत आहे. त्याचबरोबर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

शनिवारी संध्याकाळी गणपती विसर्जनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सलमान खानच्या कुटुंबीयांचा आहे. ज्यात अर्पिताने हातात बाप्पाची छोटी मूर्ती धरली होती. तर सोहेल, आयुष शर्मा आणि इतर मोठ्या मूर्तीच्या मागे जाताना दिसत आहेत.

प्रत्येक वेळी मोठ्याने या उत्सवाचा भाग असणारा सलमान खान यावेळी घराच्या या उत्सवाला उपस्थित राहू शकला नाही. बाकी सर्व सदस्य या दरम्यान उपस्थित होते. खरं तर सध्या भाईजान त्याच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने परदेशात आहे. त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांनी दरवर्षी प्रमाणेच या ही वर्षी तितक्याच धूमधडाक्यात हा सण साजरा केला.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षयच्या आईच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी लिहिलं भलं मोठ्ठं पत्र; वाचून अभिनेताही झाला भावुक

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

हे देखील वाचा