Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘भाईजान’ सलमान खानच्या बहुचर्चित ‘राधे…’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, चित्रपटगृहांसह ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीझ

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाचा चित्रपटसृष्टीवर देखील खूप परिणाम झालेला दिसत आहे. या कालावधीत अनेक चित्रपट प्रदर्शित होणार होते. परंतु कोरोना महामारीमुळे जवळपास सर्वच चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा लांबवण्यात आल्या आहे. यात समावेश होतो, सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचा. नुकतेच या चित्रपटाच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. हा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे, याबाबत सलमान खानच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली होती. अखेर या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.

खरं तर हा चित्रपट मागच्या वर्षी रमजान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे मागच्या वर्षी देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता या वेळेस हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा एक नवा मार्ग शोधून काढला आहे. ‘राधे’ हा चित्रपट चित्रपटगृहात तसेच ओटीटी आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे ओटीटी अधिकार झी ५ कडे आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट कुठे प्रदर्शित होईल, याची सगळेजण वाट बघत होते. परंतु हा चित्रपट आधी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सलमान खानच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

प्रभूदेवाने दिग्दर्शन केलेल्या राधे चित्रपटात सलमान खान आणि दिशा पटाणी हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, पण त्याचे स्वरूप वेगळे असणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना ‘पे पर व्ह्यू’ नुसार पाहता येणार आहे. म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट बघायला प्रेक्षकांना पैसे द्यावे लागणार आहेत. सोबतच देश- विदेशात जिथे कुठे चित्रपटगृह खुली आहेत, तिथे हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. राधे हा चित्रपट 13 मे ला सर्वत्र प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

राधे हा चित्रपट मिडल इस्ट, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युरोप, उत्तर अमेरिका, सिंगापूर‌ यांसारख्या 40 देशांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. राधे हा भारतातील पहिला चित्रपट असणार आहे, जो पहिल्यांदा युरोपमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिल वाले दुल्हनियाच्या गॉंव की छोरीपासून ते टॉपच्या क्रिकेट अँकरपर्यंत मंदिरा बेदीच्या लूक्समधील ट्रान्सफॉर्मेशन

-प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानला पितृशोक, हृदयविकारामुळे वडिलांनी घेतला जगाचा निरोप

-जर कॉमेडीचा शहेनशाह सतिश कौशिकचा अस्सल अभिनय पाहायचा असेल तर हे पाच सिनेमे नक्की पाहा

हे देखील वाचा