Saturday, June 29, 2024

सल्लू प्रेमींसाठी खुशखबर, सलमानच्या नव्या गाण्याला ९ तासांत तब्बल एक कोटी हिट्स

सलमान खानचा बहुचर्चित ‘राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दर्शवली आहे. त्यानंतर या चित्रपटातील ‘सिटी मार’ हे गाणे देखील चर्चेत आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे बोल प्रसिद्ध झाले आहे. यातच सलमान खानने या गाण्याचा डान्स नंबर देखील प्रदर्शित केला आहे. सिटी मार या गाण्यातील डान्स स्टेप्स सलमानच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सलमान खानच्या सिटी मार या गाण्याला कमाल खान आणि इयूलिया वंतुर यांनी गायले आहे.शब्बीर अहमद यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. म्युझिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी या गाण्याला कंपोज केले आहे. याआधी त्यांनी सलमान खानचे रेडी या चित्रपटातील ‘डिंक चिका’ हे गाणे कंपोज केले होते.

सिटी मार या गाण्यात सलमान खान सोबत दिशा पटानीने देखील तिच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या डान्स मधील सलमान खानची हुक स्टेप प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान मुंबईमध्ये अनाधिकृत चाललेल्या अमली पदार्थांच्या व्यापारावर बंदी आणताना दिसत आहे.

https://www.youtube.com/watch?v=25eVf1z8dQw

राधे चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॉकी श्रॉफ महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.सलमा खान, सोहेल खान आणि रिल लाईफ प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडद्वारा निर्मित हा चित्रपट 13 मेला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट बघण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. हा चित्रपट ‘जी ५’ आणि ‘जी प्लेक्स’ वर प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा