Wednesday, July 3, 2024

‘सैराट’ फेम सल्याला पुण्यात रिक्षावाल्याकडून मनस्ताप, फेसबूक पोस्ट करत वाचला तक्रारीचा पाढा

‘सैराट’ चित्रपट म्हणल की आजही आपल्याला आर्ची, परश्याची जोडी आठवते.नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाने मराठी सिने जगताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या चित्रपटातूनच घराघरात प्रसिद्ध झालेला अभिनेता सल्या म्हणजेच अरबाज शेखची सोशल मीडिया पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने पुण्यातील रिक्षाचालकाने दिलेल्या त्रासाचा पाढा वाचत आपला मनस्ताप व्यक्त केला आहे. अरबाजची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन अरबाजने ही पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तो म्हणतो की, “नांदेड सिटी ते पुणे स्टेशन 198 रुपये होतात. मी कधीच ola, uber, rapido असले ॲप use करत नाही पाऊस चालू होता. मित्राला म्हणालो पाऊस चालू आहे कुठे सोडायला येतो आणि परत पावसात ये ये आणि जा जा. माझ्या मित्राने मला रिक्षा करून दिली rapido ॲप वरून. पाऊस चालू होता. नांदेड सिटी मधून रिक्षा निघाली. त्याने मला खूप फिरवले.मी त्याला सांगितलं दादा तू खूप फिरवतो, त्या वर त्याने काही उत्तर दिले नाही.”

“60 रुपये एक्स्ट्रा मागायला सुरुवात केली .मी म्हणलो. का ? मी त्याला विचारलं असता त्याने मला शिवी दिली. पाऊस चालू आहे, तू हितेच उतर जास्त बोलू नको, मी रोज रिक्षा चालवतो तू नही. 60 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागेल नही तर हितेच उतर. मी उतरू शकत नव्हतो आणि मला ट्रेन होती 6 ची. गावी जायचं होत. मी त्याला ओळख सांगितली नाही माझ्या सारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर हे असे face करावे लागत असेल तर गावावरून/ फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील. त्यांची हे लोक किती लूट करत असतील, हे कुठे तरी थांबल पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढतील.” दरम्यान अरबाज शेखची ही सध्या चांगलीच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हे देखील वाचा