दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता नागा चैतन्य आणि समंथा अक्किनेनी या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याचे दिसत होते. तसेच काही दिवसांपूर्वीच नागा चैतन्यचे वडील अक्किनेनी नागार्जुन यांनी या दोघांची भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु एकमेकांचे विचार पटत नसल्याने त्यांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सर्व चाहत्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही दोघांनी खूप विचार करून आता शांतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही एकमेकांना इथून पुढे स्वतःचा वेळ देणार आहोत. आम्ही आत्तापर्यंत एकमेकांबरोबर पती- पत्नी म्हणून खूप चांगला वेळ घालवला. तसेच आता सर्व हितचिंतकांना आणि चाहत्यांना आमच्या या निर्णयासाठी पाठिंबा देण्याची विनंती करत आहोत.”
https://www.instagram.com/p/CUhawZvrPK9/?utm_source=ig_web_copy_link
साल २०१७ मध्ये या दोघांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली होती. बरेच दिवस या दोघांनी एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर कुटुंबियांच्या संमतीने यांनी विवाह केला. आता दोघांचे विचार पटत नसल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांच्या वेगळे होण्याने त्यांचे चाहते खूप दुःखी आहेत. अनेक जण त्यांना पाठिंबा देत आहेत, तर काही जण त्यांना वेगळे न होण्याची विनंती करत आहेत.
अवघ्या चार वर्षांमध्ये यादोघांचे नाते तुटले आहे. परंतु ते एक मित्र मैत्रीण म्हणून कायम एकमेकांबरोबर आसणार आहेत. सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून त्यांच्या भांडणाचीच चर्चा सुरू होती. अक्किनेनी नागार्जुन यांनी स्वतः लक्ष घालून देखील त्यांचं पती- पत्नीचं नात वाचू शकलेलं नाही.
अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी दोघांनीही अभिनय क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे. नागा चैतन्य लवकरच ‘ लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर
-शर्टची बटणं खोलून साराने हॉट फोटो केले शेअर, तिच्यावरून नजर हटविणंही झालंय कठीण
-‘ही पाहा ऍटिट्यूडवाली आंटी…’, करीनाचे उद्धट वागणे पाहून नेटकऱ्यांची सुनावले तिला चांगलेच खडेबोल