Thursday, April 24, 2025
Home अन्य समांथा अक्किनेनी हीने पत्रकारांना केला ‘हा’ सवाल; सगळ्यांची झाली बोलती बंद

समांथा अक्किनेनी हीने पत्रकारांना केला ‘हा’ सवाल; सगळ्यांची झाली बोलती बंद

समंथा अक्किनेनी ही तेलगू आणि तमिळ या चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयाने आणि सौंदर्याने ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने देखील सोशल मीडियावर समंथाचे कौतुक केले होते. तिच्या‌‌ सौदर्याचे आणि अभिनयाचे संपूर्ण देशभरात चाहते आहेत .त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,‌ ती कधी तिचा हॉट फोटो तर कधी तिच्या साध्याभोळ्या फोटोने सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करत आहे. तिचा नुकताच एक व्हिडिओ सगळ्यांसमोर आला आहे. तिचा हा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल‌‌ होताना दिसत आहे.

समंथा अक्किनेनी हिने एक व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये ती पत्रकारांना एक गंभीर प्रश्न विचारत आहे. अत्यंत मस्तीच्या मूडमध्ये तिने हा प्रश्न विचारला आहे. तिने विचारले की, “कोणत्याही घटनेवर किंवा गोष्टीवर मत मांडल्यावर किंवा अगदी कोणतेही मत न मांडल्यावर देखील प्रत्येक कलाकाराला वाईट का बोलले जाते? अरे आम्ही पण माणूस आहोत, आम्ही सुद्धा चुका करतो. परंतु आमची प्रत्येक गोष्ट खूप चर्चेमध्ये आणली जाते. अनेक कलाकार ऑफस्क्रीन गप्प राहतात कारण त्यांचे कोणतेही बोलणे सोशल मीडियावर अनेकवेळा चुकीच्या पद्धतीने घेतले जाते. परंतु अशाच सामाजिक मुद्द्याला घेऊन आम्ही चित्रपट बनवले आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर टीका करू नका.” तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. तसेच तिचे अनेक चाहते तिला सपोर्ट करताना देखील दिसत आहे.

 

समांथाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या गुनसेखर यांची पौराणिक कथा ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये ती खूप वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. समांथाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलायचे झाल्यास, ती खूप ऐषाआरामाचे आयुष्य जगत आहे . तिच्याकडे अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे. या वेगवेगळ्या गाड्यांमध्ये समांथा अनेक वेळा स्पॉट झाली आहे.

हे देखील वाचा