Tuesday, July 9, 2024

काय सांगता! समंथा अक्किनेनी अन् नागा चैतन्यच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अभिनेते नागार्जुन यांची सून आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री समंथा अक्किनेनीने अलिकडेच ‘द फॅमिली मॅन २’ मध्ये झळकली होती. मनोज बाजपेयीच्या या मालिकेत तिने खूप चांगले काम केले आहे. या मालिकेमुळे ती बरीच चर्चेत होती. काही दिवसांपूर्वी तिला इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न अवॉर्ड्स २०२१ मध्ये या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पण चित्रपट आणि व्यावसायिक आयुष्याबरोबरच, समंथा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत आहे. किंबहुना, त्यांचे लग्न मोडल्याच्या बातम्या देखील येत आहेत.

पतीबरोबरच्या नात्यात दुरावा
माध्यमांतील वृत्तानुसार, समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या वैवाहिक जीवनात थोडी कुरबूर सुरू झाली आहे. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. मागील काही काळापासून हे दोघं एकत्र राहत नाहीत. परंतु याबद्दल या दोघांनी अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती.

समंथाने दिली प्रतिक्रिया
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना, समंथा अक्किनेनीने तिच्या आणि नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनात फूट पडल्याच्या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जेव्हा तिला हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा समंथाने उत्तर दिले की, ‘ती अशा अर्थ नसणाऱ्या बातम्यांवर क्वचितच बोलते.’ समंथा म्हणाली की, ‘प्रत्येक माणसाला आपले मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे.’

विवाद हा सामान्य जीवनाचा एक छोटासा भाग
अभिनेत्री समंथा अक्किनेनी पुढे म्हणाली की, ‘चर्चा हा सेलिब्रिटींच्या आयुष्याचा एक अतिशय छोटा भाग आहे, त्यामुळे ती अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही किंवा अशा गोष्टीमुळे तिचे डोक खराब करत नाही.’

https://www.instagram.com/p/BZ89wdwhCX0/?utm_source=ig_web_copy_link

नागा चैतन्य प्रश्न टाळताना दिसला
माध्यमांतील वृत्तानुसार, नागा चैतन्य कथितपणे निर्माते आणि मीडियाचे प्रश्न आणि कॉल टाळत आहे. जे त्याच्या पत्नी समंथासोबतच्या लग्नाच्या संभाव्य अडचणींबद्दल विचारतात. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

कशी पसरली बातमी
लग्नानंतर, समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव लावले होते, जे नागा चैतन्यचे आहे. ती सोशल मीडियावर नागासोबतचे फोटो अनेकवेळा शेअर करत राहते. परंतु नागा सोशल मीडियावर तितका सक्रिय नाही. जेव्हापासून तिने आपले आडनाव काढून टाकले, तेव्हापासून लोकांच्या मनात समंथा आणि नागा चैतन्य यांच्या संबंधाबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सैराट’ फेम आर्चीच्या लूकमध्ये आलाय कमालीचा बदल; चाहत्यांकडून थेट श्रीदेवींशी केली जातेय तुलना

-‘गुलाबाची कळी’ तेजस्विनी पंडितचा सुंदर लूक पाहून कलाकारांसोबत चाहतेही झाले ‘शायर’, म्हणतायत…

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

हे देखील वाचा