Thursday, June 26, 2025
Home साऊथ सिनेमा समंथाशी घटस्फोटानंतर अवघ्या तीन महिन्यांत दुसरं लग्न करतोय नागा? ‘अशी’ केलीय तयारी

समंथाशी घटस्फोटानंतर अवघ्या तीन महिन्यांत दुसरं लग्न करतोय नागा? ‘अशी’ केलीय तयारी

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांची जोडी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप पसंत आहे. पण काही काळापूर्वी दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या इंटरनेटवर प्रचंड चर्चेत होत्या. आता काही काळानंतर पुन्हा एकदा अशी बातमी समोर येत आहे, ज्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही.

सर्वांना माहीत आहे की, घटस्फोटानंतर दोन्ही कलाकार आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दरम्यान, एका बातमीमुळे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. तसेच, ही बातमी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटाच्या घोषणेनंतर अवघ्या काही महिन्यांतच चित्रपट स्टार नागा चैतन्य दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. होय, फिल्मस्टार नागा चैतन्यने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे ऐकायला मिळत आहे. (samantha ruth prabhu ex husband naga chaitanya is going to do second marriage)

यावेळी अभिनेता कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करू इच्छित नाही. त्यामुळे तो इंडस्ट्रीबाहेरील कोणाशी तरी लग्न करण्याच्या तयारीत आहे. समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य खूपच तुटल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आता तो कोणत्याही अभिनेत्रीसोबत पुन्हा लग्न करू इच्छित नाही. तसे, या अहवालांवर नागा चैतन्यच्या बाजूने किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र, या वृत्तांमध्ये किती तथ्य आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

श्रुती हासनला देखील केलंय डेट
समंथापूर्वी, अभिनेत्याच्या श्रुती हासनसोबत (Shruti Haasan) डेटिंगच्या बातम्याही समोर आल्या होत्या. नागा या अभिनेत्रीशी लग्न करू इच्छित असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, हे होऊ शकले नाही. काही कारणाने त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर काही वेळातच समंथाने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला आणि दोघांनी २०१७ मध्ये एकमेकांशी लग्न केले. खेदाची गोष्ट म्हणजे, हे जोडपे ४ वर्षातच वेगळे झाले. गेल्या वर्षी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा करताना, समंथा आणि नागा यांनी सोशल मीडियावर असेच अधिकृत विधान जारी केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा