Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड ठरल तर! दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत करणार बॉलिवूड पदार्पण

ठरल तर! दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत करणार बॉलिवूड पदार्पण

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही दाक्षिणात्य सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. द फॅमिली मॅन वेबसिरीजमधील समंथाच्या दमदार अभिनयाची जोरदार चर्चा रंगली होती. आता लवकरच समंथा बॉलिवूडमध्येही दमदार पदार्पण करणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. 

‘द फॅमिली मॅन 2’ मधील तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केल्यानंतर, समंथा रुथ प्रभू बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समंथा लवकरच आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी हा चित्रपटही साइन केला आहे. हा चित्रपट दिनेश विजानच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे तयार केला जाईल. कागदोपत्री काम पूर्ण झाले असून सध्या शूटिंगचे वेळापत्रक आणि तारखा निश्चित होत असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी सध्या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या आहेत. असे सांगितले जात आहे की या वर्षाच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग फ्लोरवर जाऊ शकते आणि 2023 च्या अखेरीस तो प्रदर्शित होईल.

रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, समंथाने तिचा दुसरा हिंदी चित्रपटही साइन केला आहे. हा एक पौराणिक चित्रपट असेल, ज्याचे शूटिंग 2023 मध्ये सुरू होऊ शकते. सिने जगतात सुरू असलेल्या चर्चांवर विश्वास ठेवला तर करण जोहरच्या पुढच्या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. दोघे लवकरच करणच्या चॅट शोमध्येही एकत्र दिसणार आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

विशेष म्हणजे समंथा ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नुकतेच पुष्पा चित्रपटातील तिचे ‘ऊ अंतवा’ हे गाणे खूप हिट ठरले. या गाण्यात आपल्या दमदार अभिनयाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. ही अभिनेत्री लवकरच विजय देवरकोंडासोबत कुशी या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा निर्वाण यांनी केले आहे.

 

हे देखील वाचा