Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड विकी कौशल-समंथा मोठ्या पडद्यावर दिसणार एकत्र? आगामी चित्रपटाची उत्सुकता शिगेला

विकी कौशल-समंथा मोठ्या पडद्यावर दिसणार एकत्र? आगामी चित्रपटाची उत्सुकता शिगेला

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. ती आयुषमान खुरानाबरोबर दिनेश विजनच्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता अनेक वृत्तांनुसार ती फिल्ममेकर आदित्य धरच्या आगामी ‘द इमोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. या चित्रपटात विकी कौशल देखील असणार आहे.

अशीही चर्चा आहे की, धरने सांगितलेली सिनेमाची कथा समंथाला पसंत पडली असून, जर सर्व सुरळीत राहिलं तर ‘अश्वत्थामा’ चित्रपटात दिसू शकते. धरने या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली असून पुढीलवर्षी शूटींग सुरू होण्याची शक्यता आहे. विकी सध्या ‘सॅम बहाद्दुर’ चित्रपटाच्या शूटमध्ये व्यस्त आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा