मागील अनेक दिवसांपासून दाक्षिणात्य कलाकार या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत येत आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात गाजत असलेले प्रकरण म्हणजे समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्यचा घटस्फोट. मागील अनेक महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. मात्र समंथाने स्वतः तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून अधिकृतरित्या घटस्फोटाची माहिती दिली. या दोघांच्या घटस्फोटानंतर अनेक अफवा उडायला लागल्या. मात्र यासर्वांमधे समंथाने तिचे मतं सर्वांसमोर ठेवले. या घटस्फोटानंतर ती सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच सक्रिय आहे. नेहमी ती तिच्या पोस्टच्या माध्यमातून सूचक पोस्ट किंवा कॅप्शन देत असते.
नुकताच समंथाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याचे कॅप्शन पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये समंथासोबत एक महिला दिसत असून, ती ऑर्गनाइज विद इजी नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटची सदस्य आहे. या व्हिडिओमध्ये समंथा तिच्या डॉगीसोबत घरात दिसत असून, सोबतच कपडे, सँडल्स, बॅग, पर्स आदी अनेक वस्तूंचा खच पडल्याचेही दिसत आहे.
समंथाने हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने मेरी कॉन्डो यांची एक ओळ, “जोडण्यापेक्षा जास्त आवश्यक आहे सोडून देणे” लिहिली आहे. या व्हिडिओला अगदी कमी काळात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय तिचे फॅन्स तिच्या या व्हिडिओवर तिला अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच समंथा चार धाम यात्रा करून आली आहे. याशिवाय ती महाऋषि महेश योगी यांच्या आश्रमात देखील गेली होती.
समंथाने घटस्फोटानंतर ती तिच्या नव्या आयुष्याची सुरूवात करण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने मुलींच्या पालकांना सल्ला दिला की, मुलींचे लग्न करण्यापेक्षा त्यांना सक्षम बनवा. समंथा नागाशी संबंधित कोणत्याच आठवणी स्वतःजवळ ठेऊ इच्छित नाही. तिने सोशल मीडिया अकाऊंटवरून नागासोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहे. तिला त्याच्या आठवणी स्वतःशी जोडून ठेवायच्या नाहीये.
समंथा लवकरच विग्नेश सिवन यांच्या ‘काथुवाकुला रेंडु कधाल’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती गुनाशेखर यांच्या ‘शकुंतलम’ मध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! शाहरुख खानचा छोटा मुलगा अबरामला काजोलचा येतो खूप राग, पण का?
-‘या’ कारणावरून झाला होता शाहरुख अन् सलमानमध्ये वाद, कॅटच्या वाढदिवशी हाणामारीपर्यंत पोहचली गोष्ट
-Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू