Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी समर सिंग अन् शिल्पी राजच्या ‘प्याज छिल रहा है’ गाण्याने रिलीझ होताच केली धमाल; मिळाले लाखो व्ह्यूज

समर सिंग अन् शिल्पी राजच्या ‘प्याज छिल रहा है’ गाण्याने रिलीझ होताच केली धमाल; मिळाले लाखो व्ह्यूज

भोजपुरी चित्रपट आणि संगीत क्षेत्रात दररोज अनेक गाणी प्रदर्शित होत आहेत. यात भोजपुरीमधील देशी स्टार समर सिंग कसा मागे राहू शकतो?? भोजपुरीसृष्टीत आपल्या युनिक म्युझिक सेन्ससाठी प्रसिद्ध असलेली कंपनी वर्ल्ड वाईड रेकॉर्ड वरून समर सिंगचे एक भोजपुरी गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे नाव ‘प्याज छिल रहे हैं’ हे आहे. या गाण्याला यूट्यूबवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

समर सिंग आता मिलिनिअम स्टार बनला आहे. कारण त्याच्या प्रत्येक व्हिडिओला यूट्यूबवर मिलियन व्ह्यूज मिळत असतात. समर सिंगने नुकतेच काही दिवसांपूर्वी आकांशा दुबेसोबत गाणे गायले आहे. त्यांची जोडी यूट्यूबवर खूप हिट झाली आहे. वर्ल्ड वाईड रेकॉर्ड प्रस्तुत हे गाणे समर सिंगने ट्रेंडिंग गायिका शिल्पी राजसोबत गायले आहे. त्यांचे हे गाणे यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे. या गाण्याला आतापर्यंत २ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

वेडिंग स्पेशल असणाऱ्या गाण्याचा ऑडिओ प्रदर्शित झाला आहे. लवकरच या गाण्याचे व्हिडिओ व्हर्जन वर्ल्ड वाईड रेकॉर्ड द्वारा प्रदर्शित केले जाणार आहे. या गाण्यात समर सिंगसोबत आकांशा दुबे परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. प्रभू विशूनपूर यांनी हे गाणे लिहिले आहे. विकास यादव यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. संदीप राज हे कोरिओग्राफर आहेत. विवेक हे वीएफएक्स एडिटर आहेत. पंकज सोनी हे निर्माते आहेत.

शिल्पी राज आणि समर सिंग हे दोघेही भोजपुरी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले गायक आहेत. त्यांनी भोजपुरी संगीत क्षेत्राला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा