हिंदी चित्रपटांना टक्कर देत आता भोजपुरी चित्रपट आणि गाणी पुढे चालली आहेत. भोजपुरी कलाकार आपल्या अभिनयाने तसेच डॅशिंग लूकने खूप चर्चेत असतात. या चित्रपटांमध्ये आणि गाण्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. यातील ऍक्शन सीन हे खूप दमदार असतात. कल्पनेच्या पलीकडील स्टंट चित्रपटांमध्ये दाखवले जातात. त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणावर या चित्रपटांकडे आणि गाण्यांकडे आकर्षित होते.
सध्या समर सिंग आणि आकांक्षा दुबेचे एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या दोघांचे ‘स्टेजवे सहित फेकवा देहब’ हे गाणे वर्ल्ड वाईड रेकॉर्ड्स भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर शुक्रवारी (१० सप्टेंबर) प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यामध्ये दोन्ही कलाकारांचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे. अभिनेत्री आकांक्षाने, तर कमालच केली आहे. तिच्या डान्सने आणि मोहक अदांनी चाहत्यांचे हृदय जरा जास्तच धडधडू लागले आहे. या गाण्यामध्ये तिने सुरुवातीला काळ्या रंगाचा घागरा घातला आहे. अर्ध्या गाण्यानंतर ती लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये दिसत आहे. या दोन्ही पोषाखामध्ये ती खूप सुंदर दिसते.
गोल्डी जैस्वाल दिग्दर्शित ‘स्टेजवे सहित फेकवा देहब’ या गाण्याचे बोल कुंदन प्रीतने लिहिले आहे. तसेच या गाण्याला समर सिंग आणि खुशबू तिवारीने आपला आवाज दिला आहे. एडीआर आनंद यांचे म्युझिक या गाण्याला लाभले आहे. यामध्ये कोरियोग्राफी बॉबी जॅक्सन यांनी केली आहे, तर एडिटर पप्पू वर्मा आणि कॅमेरा मॅन संतोष यादव आहेत. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून अनेकांना याचे वेड लागले आहे. गाण्यामध्ये दोन्ही कलाकारांची केमेस्ट्री खूप चांगली रंगली आहे. प्रदर्शित होताच या गाण्याला एका दिवसाच्या आत १० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या गाण्यासह समर सिंग आणि आकांक्षा दुबेचं आणखीन एक गाणं सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. यात दोघांमध्ये सुरू असलेली प्रेमळ भांडण पाहायला मिळत आहेत. तसेच एका मुलीचा लग्ना आधीच प्रियकर आणि लग्नांनंतरचा नवरा यावरून वाद सुरू असल्याचे दिसत आहे. दोघांचे या गाण्यातील हावभाव मोठे कमालीचे आहेत. हे गाणे अभिनेत्याने स्वतःच्या ऑफिशिअल यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे. जर तुमच्याही आयुष्यात बॉयफ्रेंड आणि नवऱ्यावरून वाद होत असतील, तर हे मजेशीर गाणं नक्की पाहा.
‘कमर के दरद सह ना पईबू’ या गाण्यातील आकांक्षाचा सफेद रंगाच्या ड्रेसवरील लूक देखील सध्या चर्चेत आहे. या दोन्ही कलाकारांचं प्रत्येक गाणं भरपूर हिट होतं. कारण हे दोघेही त्यांच्या अभिनयाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करतात. या गाण्याचे दिग्दर्शक सुनील बाबा आहेत. तसेच हे गाणे स्वतः समर सिंगने अंकिता सिंगसह गायले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ
-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा