Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

मुंबईत क्रूझवर झालेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं प्रकरण आता जोर धरू लागलं आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणावर बराच वाद चालू असलेला दिसत. काहीजण एनसीबीचे समर्थन करत आहेत, तर काहीजण शाहरुख खानला पाठिंबा देत आहेत. त्याचवेळी काही लोक असेही आहेत, ज्यांनी एनसीबीवर शाहरुख खानला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत, मोठे विधान केले आहे. 

‘आम्ही कोणालाही लक्ष्य करत नाही’
समीर वानखेडे एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, “आम्ही कोणालाही लक्ष्य करत नाही. आमच्याकडे त्यांच्या विरोधात काहीच नाहीये. आम्ही गेल्या १० महिन्यांत ३०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. यापैकी जास्तीत जास्त ४ ते ५ ओळखीचे लोक असतील. तर तुम्ही कसे म्हणू शकता की, आम्ही एखाद्याला लक्ष्य करत आहोत? गेल्या एका वर्षात अटक केलेले बहुतेक लोक कट्टर, अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हेगार आहेत.” (sameer wankhede on aryan khan drugs case we are not targeting anyone)

‘एनसीबी नेहमी अंमली पदार्थांचे सेवन थांबवण्याचे काम करते’
वानखेडे यांनी असेही सांगितले की, मीडिया कव्हरेज तेव्हाच केले जाते जेव्हा एखादी प्रसिद्ध व्यक्ती कायदा मोडताना पकडली जाते. एनसीबी वर्षभर पेडलर्स आणि सप्लायर्सना अटक करून अंमली पदार्थांचा धोका संपवण्याचे काम करते. आपलं बोलणं संपवत वानखेडे म्हणाले की, एनसीबी इव्हेंट आयोजकांकडून अशा उपक्रमांविषयी आणि पार्ट्यांबद्दल चौकशी देखील करत आहे.

आर्यन खानला नाही मिळाला जामीन
शनिवारी रात्री उशीरा (२ ऑक्टोबर) एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर रेव्ह पार्टी दरम्यान छापा टाकला होता. जिथून अनेक लोक अंमली पदार्थांचे सेवन करताना रंगेहाथ पकडले गेले. एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही या पार्टीतून अटक केली आहे, ज्याला काल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच वेळी न्यायालयाने जामीन मंजूर न करता, त्याला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा