Monday, June 17, 2024

‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’, कार्यालयात उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला धरलं धारेवर

मुंबई क्रूझ अंमली पदार्थ प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा(NCB) तपास वेगाने पुढे जात आहे. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बऱ्याच काळापासून तुरुंगात असून, न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्जही फेटाळला आहे. त्यानंतर आर्यन खानने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचवेळी या प्रकरणात चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडेचे नावही समोर आले आहे.

समीर वानखेडेंनी धरलं धारेवर
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेची दोनदा चौकशी केली आणि आता तिसऱ्यांदा अभिनेत्रीला २६ ऑक्टोबर म्हणजे सोमवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलं आहे. अभिनेत्री दोन्ही वेळा एनसीबी कार्यालयात उशिरा पोहचली होती, ज्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अनन्याला चांगलंच फटकारलं आहे. एवढंच नाही, तर ते अनन्याला असेही म्हणाले की, हे तुमचं प्रॉडक्शन हाऊस नाही. (sameer wankhede scolded ananya pandey for arriving late at ncb office saying this is not a production house)

अनन्या पांडेची शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. या दरम्यान, अनन्याला सकाळी ११ वाजता एनसीबी कार्यालयात पोहचण्यास सांगितलं गेलं. परंतु अभिनेत्री सकाळी ११ वाजता नाही, तर दुपारी २ वाजता तिथे पोहचली. अनन्याचं उशिरा येणं एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अजिबात आवडलं नाही, यामुळे त्यांनी अनन्याला फटकारलं. ते म्हणाले, “तुला सकाळी ११ वाजता बोलवलं होतं आणि तू आता येत आहेस. अधिकारी तुमची वाट पाहत बसणार नाहीत. हे तुमचं प्रॉडक्शन हाऊस नाही. हे केंद्रीय एजन्सीचं कार्यालय आहे. तुला बोलावलं त्या वेळीचं यायचं.”

चार तास चालली चौकशी
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेची दोनदा चौकशी केली. गुरुवारी अभिनेत्रीची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली. या दिवशी अभिनेत्रीला एनसीबी कार्यालयात दुपारी २ वाजता बोलावण्यात आले होते, पण ती दुपारी ४ च्या सुमारास पोहोचली. यादरम्यान अनन्याची २ तास चौकशी करण्यात आली. यानंतर शुक्रवारी अनन्याची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. तिला सकाळी ११ वाजता बोलावण्यात आले आणि अभिनेत्री दुपारी २.३० वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली. या दरम्यान, अभिनेत्रीची चौकशी सुमारे चार तास चालली. अनन्याला आर्यन आणि अं’मली पदार्थांसंबंधित प्रश्न विचारण्यात आले.

चॅटमुळे आला संशय
एनसीबीला आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या चॅट मिळाल्या आहेत, ज्यामुळे अनन्या पांडे या प्रकरणात अडकली आहे. हे चॅट्स २०१८ ते २०१९ मधली आहे. यात अनन्याने आर्यनला गांजा देण्यास सांगितलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या अनन्या पांडेचे पार्टी फोटो व्हायरल

-सलग दुसऱ्या दिवशी एनसीबीच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर झाली अनन्या पांडे, वडील चंकी पांडेही होता सोबत

-‘अनन्या पांडे जगातील सर्वात मोठी मूर्ख’, म्हणत ‘या’ स्टारकिडला एनसीबी चौकशीला बोलावण्याचा कमाल खानचा दावा

हे देखील वाचा