आपल्या अभिनयाने आणि विनोदाने सर्वांना खळखळून हसवण्यासाठी अनेक कलाकार नेहमीच सज्ज असतात. अनेक विनोदी कार्यक्रम टेलिव्हिजनवर चालू असतात. अशीच प्रेक्षकांना हास्याच्या महासागरात नेऊन सोडणारा सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ होय. यातील सगळेच कलाकार एका पेक्षा एक आहेत. यापैकीच एक कलाकार म्हणजे समीर चौगुले (Samir Choughule) होय. तो या शोधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. अशातच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करून त्याने त्याच्या जवळच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
समीरने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, त्याच्यासोबत अभिनेता दत्ता मोरे (Datta More) दिसत आहे. हा फोटो शेअर करून समीरने लिहिले आहे की, “माझा अत्यंत लाडका दत्तू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासारखा निरागस अभिनय मला करता आला पाहिजे रे! तू खूप खूप गोड माणूस आहेस. काय तुझ्या प्रतिक्रिया, काय ते हावभाव, बेदम हसवतात रे. मित्रा, भावा कमाल आहेस तू. खूप मेहनती आहेस. तुला खूप प्रेम आणि शुभेच्छा दत्ता मोरे.” (Samir Choughule share his best friend photo and give best wishes og his birthday)
त्याने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. दत्ता मोरे हा देखील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमधील एक कलाकार आहे. त्याचा अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडतो.
समीर चौगुलेबद्दल बोलायचं झालं, तर त्याने अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याने ‘विकून टाक’, ‘लव्ह लफडे’, ‘ए पेईंग होस्ट’, ‘आजचा दिवस माझा’, ‘कायद्याचे बोला’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.