Wednesday, July 3, 2024

‘मला जळणाऱ्या कब्री दिसायच्या’ बिग बॉस फेम सना खानने सांगितले खतरो के खिलाडीला नकार देण्याचे कारण

टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील ओळखीचा चेहरा म्हणजे सना खान. बिग बॉस, दाक्षिणात्य सिनेमे आणि बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर अचानक तिने चित्रपटांपासून किंबहुना मनोरंजनविश्वपासून दूर जाणे पसंत केले. याचे कारण तिने इस्लाम धर्मासाठी बॉलिवूडला रामराम ठोकत असल्याचे सांगितले. पुढे तिने २०२१ मध्ये अनस सय्यद सिंगबरोबर निकाह केला. आज जरी ती या ग्लॅमर जगात काम करत नसली तरी तिची लोकप्रियता टिकून आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. एका मुलाखतीमध्ये तिने याबद्दल माहिती दिली.

सना खानने दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत. ती शेवटची खतरो के खिलाडी या शोमध्ये दिसली. या शोच्या सहाव्या पर्वात तिने सहभाग घेतला होता. ती शोमध्ये नवव्या स्थानी होती. प्रेक्षकांनी तिला या शोमध्ये खूप पसंत केले. पुढे तिला पुढच्या वर्षी पुन्हा शोची ऑफर आली होती. मात्र तिने ती ऑफर नाकारली आणि निकाह केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

सना खानने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले, “२०१९ हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. तो रमजान चा महिना होता. त्या महिन्यात शेवटी मला स्वप्नात विचित्र गोष्टी दिसायच्या. मला जळणाऱ्या कब्र दिसायच्या. मी मदतीसाठी ओरडत आहे, असेही मला दिसायचे. मला नीट झोपही यायची नाही, कारण मी खूप घाबरले होते. सुरुवातीला मी हे स्वप्न आहे म्हणून सोडून दिले. मात्र त्यानंतर मला माझ्यात अनेक बदल दिसून आले. मी कोणशी बोलूही शकत नव्हते. कारण बोलले की लोक तुमच्याविषयी विविध मत बनवतात. माझ्या आयुष्यातील तो सगळ्यात कठीण काळ होता”.

खतरो के खिलाडी शोला नकार देण्याबद्दल ती म्हणाली, “मला माहित होते की जर मी या शोची ऑफर घेतली तर पुन्हा सर्व गोष्टी बदलतील कारण राक्षस खूप शक्तिशाली असतो. जो आत बसला आहे. पुन्हा त्याच्यासोबत तीच लढाई मला लढणे अवघड वाटले. मी खूप प्रयत्नांनी त्याला ताब्यात आणले आहे.” ते यावेळी हे देखील स्पष्ट केले की तिने शोची ऑफर घेतली असती तरी तिच्या नवऱ्याला काहीही समस्या नव्हती. मात्र तिने तिला वाटते तो निर्णय घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझी आई मारत होती, बाबा ओरडत होते…’, वर्ल्डकपमध्ये कपडे काढल्याच्या वक्तव्यावर पूनम पांडेने उघडले गुपित

अभिनेता आकाश कुंभारचे ‘गडद अंधार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण

हे देखील वाचा