बिग बॉसच्या सना खानने 2020 मध्ये शोबिज इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सना खानने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आता ती अल्लाहच्या आदेशाचे पालन करणार आहे असे म्हणत सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता नुकताच तिने इंस्टाग्रामवर एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनाने इंडस्ट्री सोडून धर्माचा मार्ग का निवडला याचा खुलासा केला आहे. या मुलाखतीदरम्यान सना खान देखील भावूक झाल्याचे दिसत आहे. तिने नाव, प्रसिद्धी आणि पैसा सोडून हिजाब का घातला हे सांगितले. अभिनेत्री म्हणाली की, माझ्या भूतकाळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा सर्वकाही माझ्याकडे आहे. मला पाहिजे ते मी करू शकत होते. पण एक गोष्ट हरवत होती ती म्हणजे माझ्या मनाची शांती. म्हणूनच मी हा निर्णय घेतला.
सना पुढे म्हणाली की, “माझ्याकडे सर्व काही आहे पण मी आनंदी नाही. हे सर्व माझ्यासाठी खूप कठीण होते, काही काळ असा होता जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होते. या वेळी मला देवाचा संदेश मिळाला, त्याने एक चिन्ह दिले. 2019 पासून तिच्यामध्ये बदल कसा सुरू झाला हे अभिनेत्रीने सांगितले. सना म्हणाली की “तिला स्वप्नात कबरी दिसायची. यावेळी तिला जळणारी कबर दिसायची आणि त्या थडग्यात ती स्वतःला पाहायची.तिने एकदा एक रिकामी कबर पाहिली होती, ज्यामध्ये तिने स्वतःला पाहिले होते. तेव्हा मला जाणवले की मला अल्लाहकडून हे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत जर मी स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही तर माझा असाच अंत होणार आहे. या सर्व प्रकारानंतर मला चिंता वाटू लागली.”
View this post on Instagram
सना म्हणाली की ‘तिने मन शांत करण्यासाठी प्रेरणादायी भाषण कसे ऐकायला सुरुवात केली. सना म्हणाली की, झालेला बदल मला अजूनही आठवतो. सना म्हणते की तिने सर्व प्रेरक भाषणे ऐकली आणि एका रात्री तिने खूप सुंदर काहीतरी वाचले. यादरम्यान सनाने कधीही हिजाब न सोडण्याची शपथ घेतली. मेसेजद्वारे तिला सांगण्यात आले होते की, हिजाब परिधान करण्याचा तुमचा शेवटचा दिवस हा पहिला दिवस असावा असे तुम्हाला वाटत नाही. पुढे बोलताना ती म्हणाली की मी दुसऱ्या दिवशी उठले तेव्हा माझा वाढदिवस होता. माझ्याकडे घरात खूप स्कार्फ होते, जे मी आधी विकत घेतले होते. मी टोपी बाजूला ठेवली, स्कार्फ घातला आणि स्वतःला सांगितले की मी ती कधीही काढणार नाही.” दरम्यान सना खान बिग बॉस मध्ये चांगलीच गाजली होती.
हेही वाचा –
मिका सिंगला मिळाली त्याची स्वप्नसुंदरी, ‘या’ मुलीची स्वयंवरात गायकाने केली निवड
करण जोहरची ‘ती’ पोस्ट कुणासाठी? म्हणतोय ‘थांबा रक्तपात होणार आहे…’
नेटकऱ्यांना भावला सोनू सूदचा दिलदारपणा, व्हायरल व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव










