Saturday, June 29, 2024

इस्लामसाठी अभिनय क्षेत्र सोडणारी ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री देणार गुडन्युज? फोटो शेअर करत म्हणाली…

बॉलिवूसारख्या सारख्या ग्लॅमरस दुनियेपासून दुर झालेली प्रसिद्ध अभिनेत्री सना खान सध्या खुपच चर्चेत आली आहे. सनाने टीव्ही आणि बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. तिने 2020 साली इस्लामसाठी चित्रपटसृष्टी आणि अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. आता सना पती अनस सैय्यदबरोबर वैवाहिक आयुष्याचा आनंद लुटत आहे. सना अभिनयापासून लांब असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.

सना खान (Sana Khan) सतत आपल्या वैयक्तीक आयुष्यामध्ये होणाऱ्या घडामोडीचे पोस्ट शेअर करत चाहत्यांशी जोडलेली असते. नुकतंच अभिनेत्रा तिचा पती अनस सैय्यद (Anas Sayyad)बरोबर उमराहसाठी गेली होती. तर सनाने काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ते दोघे सोफ्यावर बसलेले दिसून येत आहेत तर दुसरा फोटो विमानतळावरचा दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करत असं कॅप्शन दिलं आहे, ज्यामुळे चाहत्यांना ती प्रग्नेंट असल्याचा अंदाज लावत आहेत.

सनाने फोटो शेअर करत लिहिले की, “हा उमराह काही कारणाने खास आहे आणि ते खास कारणही लवकरच तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे.” सनाच्या या पोस्टवर चाहत्यांना तर्क लावत कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “तू आई होणार आहेस का?” तर दुसऱ्याने लिहिले की, “अल्लाह तुला सृदृढ बाळ देवो.” एका अन्यने लिहिले की, “तू आई होणार आहेस का? म्हणूनच हा उमराह तुझ्यासाठी खास आहे?” अशाप्रकारे प्रश्नांचा भडीमार केला आहे.

 

View this post on Instagram

 

सनाने टीव्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगरी केली होती त्याशिवया सना ‘बिग बॉस 9’ चीही स्पर्धक होती. तिला बिग बॉसमध्ये चाहत्यांप्रती चांगला प्रतिसादही मिळाला होता. यानंतर तिने मोठ्या पडद्यावर नशिब आजमावलं असून काही चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्याशिवाय अभिनेत्री तिच्या लव्ह लाइफमुळेही चांलीच चर्चेत होती. पण 2020 नंतर तिच्या आयुष्यामध्ये मोठा बदल झाला आणि तिने ग्लॅमर दुनियेला सोडून स्वतःला धर्मासाठी समर्पित केलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जनतेला खुश करण्याच्या राड्यात शालिन आणि अर्चनाचा झाला तमाशा, डान्स करताना धपकन पडले अन्…
‘मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन’. राज ठाकरे यांनी ट्विट करत वाहिली लता दीदींना आदरांजली

हे देखील वाचा