Saturday, June 29, 2024

ब्रेकअप, घटस्फोट आणि पुन्हा लग्न, बॉलिवूडकरांची नात्यांची खिचडी

सिनेसृष्टीतील तारे तारकांच्या कामाप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची सुद्धा लोकांमध्ये खूप चर्चा होताना दिसते. कुणाचं नाव कधी कुणाशी जोडलं जाईल याचा काहीच थांगपत्ता नसतो.  सेलिब्रिटीदेखील त्यांच्या चाहत्यांना या चर्चांसाठी भरपूर मसाला देत असतात.

काही सेलेब्झना पहिल्याच प्रयत्नात त्यांचा यशस्वी जोडीदार मिळाला आहे तर काहींना अनेक प्रयत्न केल्यानंतर… चला तर मग अशा काही सेलिब्रिटींवर नजर टाकूयात ज्यांना खूप प्रयत्न केल्यानंतर आयुष्याचा खरा साथीदार मिळाला आहे…

 १. सैफ अली खान
सैफ आणि अमृता यांनी १९९१ साली लग्न केलं तेव्हा हे कपल खूप चर्चेचा विषय बनलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. अमृता सैफपेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. अनेकांनी हे नातं जास्त काळ टिकणार नाही असे कयास लावले आणि योगायोगाने तसंच झालं. १४ वर्षांच्या सहवासानंतर हे दोघेही घटस्फोट घेऊन कायमचे वेगळे झाले. पुढील ३ वर्षांतच सैफचं नाव करीना कपूर हिच्याशी जोडलं जाऊ लागलं. ५ वर्षांच्या रिलेशनशिप नंतर १६ ऑक्टोबर २०१२ साली हे दोघेही विवाहबद्ध झाले. सैफ याला या दोन्ही पत्नींकडून आतापर्यंत ३अपत्य आहेत. अमृता आणि सैफ ला सारा आणि इब्राहिम  तर करीना आणि सैफ ला तैमुर ही अपत्य आहेत. यातच करीना पुन्हा एकदा गरोदर असल्याने सैफसाठी चौथ्यांदा बाबा होण्यास सज्ज झाला आहे.

२. ऐश्वर्या रॉय बच्चन
मिस वर्ल्ड हा खिताब जिंकल्यानंतर नव्वदीच्या काळात ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कालांतराने सलमान खान आणि ऐश्वर्या हे रिलेशनमध्ये आले. या प्रदीर्घ रिलेशनशिप नंतर अचानक ऐश्वर्याचं नाव विवेक ओबेरॉय याच्याशी जोडलं जातं आणि सलमान – ऐश्वर्या कायमचे वेगळे झाले. यानंतर ऐश्वर्या-विवेकचं देखील पुढे माध्यमांसमोर काही आलंच नाही. इतकंच काय ऐश्वर्याने देखील विवेक सोबतचं नातं स्वीकारायला नकार दिला. यानंतर २००७ मध्ये तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या अभिषेक बच्चन याने तिला प्रपोज केलं आणि त्याच वर्षी ते दोघंही विवाहबद्ध झाले. आज या दोघांनाही आराध्या नावाची गोंडस लेक आहे.

 ३. जॉन अब्राहम – बिपाशा बासू
या दोन फुलपाखरांबद्दल काय म्हणावं? हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आठ वर्षांच्या या प्रदीर्घ नात्यानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर दोघांनीही आपली वेगळी वाट धरली आणि त्यात आता ते यशस्वी देखील झाले आहेत. बिपाशा ने वयाने तिच्यापेक्षा लहान असलेल्या करण सिंह ग्रोव्हर  सोबत लग्न केलं तर  जॉन ने सुद्धा बँकर प्रिया रूंचाल सोबत  २०१४ मध्ये लग्न केलं. आणि आता दोघेसुद्धा तीनच वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे.

 ४. नेहा कक्कड
नेहा कक्कड हे नाव हल्ली प्रत्येक तरुणाच्या ओठांवर आहे. नेहाची बॉलिवूड मधली गाणी तसेच तिची अल्बममधली गाणी  देखील तितकीच हिट होत आहेत. शिवाय कुठल्या ना कुठल्या रिऍलिटी शो मधून परीक्षकांच्या भूमिकेत ती आपल्याला सतत पाहायला मिळत आहेच.  अशा या नेहा कक्करचं दोन वर्षांपूर्वी पंजाबी अभिनेता हिमांशू कोहली याच्या सोबत ब्रेकप झालं आणि त्यानंतर ती खूप कोशात गेली होती. यावर्षी तिला तिचा खरा साथीदार मिळाला तो रोहनप्रितच्या रुपात! दोघांनी नुकतेच दुबईवरून त्यांचे हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. रोहनप्रित हा पंजाबी सिंगर आहे आणि युट्युबवर रोहनप्रितची गाणी देखील तरुणांना थिरकायला भाग पाडत आहेत.

५. सना खान
जय हो सिनेमामधून नावारूपाला आलेली अभिनेत्री तसेच बिग बॉसची रनर अप राहिलेली सण खान हीचं नुकतच मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी लग्न झालं. परंतु यापूर्वी इंडस्ट्री सोडण्याआधी सना ही कोरिओग्राफर मेलवींन लुईस बरोबर रिलेशनशिप मध्ये होती. मग अचानक दोघांचं ब्रेक अप झालं. यानंतर सना ने मेलवींन वर फसवणुकीचे आरोपही लावले. कलांतराने सना ने धर्मासाठी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. आणि आता तिला मुफ्ती अनस यांच्या रुपात जीवनाचा योग्य साथीदार लाभला आहे.

हेही वाचणं आहे महत्त्वाचं
बॉलिवूड अभिनेत्रींचा अजब कारभार! विवाहित पुरुषांसोबत बांधली लगीन गाठ
बॉलिवूड अभिनेत्रींच्या हटके लव्ह स्टोरी, कमी वयाच्या नायकांसोबत बांधली लगीनगाठ    
कलाकार आणि त्यांच्या अजब सवयी; वाचून तुम्ही ही म्हणाल असं कुठं असतं का?

 

हे देखील वाचा