Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड हिजाब घातल्याने सना खान झाली ट्रोल, अभिनेत्रीनेही ट्रोलर्सला दिले सडेतोड प्रत्युत्तर

हिजाब घातल्याने सना खान झाली ट्रोल, अभिनेत्रीनेही ट्रोलर्सला दिले सडेतोड प्रत्युत्तर

दाक्षिणात्य सिनेसृष्टी ते हिंदी सिनेसृष्टी असा प्रवास करणारी सना खान सर्वानाच आठवत असेलच. आता जरी सनाने अभिनय आणि मनोरंजनसृष्टी सोडली असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिला फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या देखील लाखोंमध्ये आहे. सनाने ‘क्रिएटर’साठी या ग्लॅमर इंडस्ट्रीचा त्याग केला. सध्या सना तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. इंडस्ट्री सोडताना सनाने क्रिएटर आणि मानवसेवा करण्यासाठी हे जग सोडत असल्याचे सांगितले होते.

अचानक सना चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सनाने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो. या फोटोमुळे सना चर्चेतही आली आणि सोबतच ट्रोलही झाली आहे. सनाने तिचा हिजाब परिधान केलेला फोटो पोस्ट केला आहे. सनाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला या फोटोत सना अतिशय सुंदर दिसत आहे, तर काहींनी सनाने हिजाबमध्ये फोटो शेअर केल्याने तिला ट्रोल केले आहे.

सनाने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुनो…! लोगों से डरते क्‍यूं हो? क्‍या तुमने ये आयत नहीं पढ़ी. ‘अल्‍लाह जिसे चाहे इज्‍जत देता है और अल्‍लाह जिसे चाहे जिल्‍लत देता है. कभी इज्‍जतों में जिल्‍लत छुपी होती है और कभी जिल्‍लतों में इज्‍जत. सोचना और समझना हमें है कि हम कौन से रास्‍ते पे हैं और असल मायने में हम किस चीज के हकदार बन रहे हैं.'”

या फोटोवर एका नेटकाऱ्याने कमेंट केली की, “एवढं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याचा काय फायदा. सगळ्यांसारखं पडद्याच्या मागेच राहायच आहे.” यावर सनाने त्याला सडेतोड उत्तर देत लिहिले की, “जेव्हा मी पडद्यात राहून माझा व्यवसाय करु शकते, माझे सासू-सासरे आणि नवरा खूप चांगले आहेत, मग मला आणखी काय पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्लाह माझे संरक्षण करतो. आणि मी माझे शिक्षण पूर्ण केले आहे, तर यात माझाच विजय आहे की नाही?”

सनाने गेल्या वर्षी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडली आहे. यानंतर सनाने सुरातच मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला. सनाने तिच्या निकाहचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा