Monday, July 8, 2024

लवकरच ‘ही’ लोकप्रिय जोडी होणार आई-बाबा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

सन २०२१ मध्ये चित्रपटसृष्टीतून अनेक आनंदाच्या बातम्या येत आहेत. अनेक कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत. तर अनेकांच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रेटी जोडी संग्राम साळवी आणि खुशबू तावडे यांनी ते लवकरच आई-बाबा होणार आहेत ही गोड बातमी सर्वांना दिली आहे. खुशबू आणि संग्राम यांनी दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही बातमी सांगितली आहे.

संग्राम आणि खुशबूने रविवारी (५ सप्टेंबर) खुशबूच्या वाढदिवशी ही गोड बातमी प्रेक्षकांना सांगितली आहे. खुशबूने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून बेबी बंप करताना एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा पती संग्राम देखील दिसत आहे. या फोटोमध्ये खुशबूने लाल आणि काळ्या लायनिंग असलेला एक पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे. तर संग्राम टी-शर्टमध्ये दिसत असून, खुशबूच्या हातावर मेहेंदी दिसत आहे. तसेच त्यांच्या मागे फुगे लावून डेकोरेशन केलेले दिसत आहे. तसेच बेबी असे लिहिलेले आहे. फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. (sanagram salavi and khushbu tawade become parents to be, give information on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आम्ही आमच्या कुटुंबात आणखी थोडे प्रेम जमा करत आहोत.” तिने शेअर केलेला या फोटोवर त्यांचे चाहते तसेच अनेक कलाकार देखील कमेंट करून त्यांचे अभिनंदन करत आहेत तसेच खुशबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देत आहेत. या फोटोवर सुयश टिळक याने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तर अभिज्ञा भावेने लिहिले आहे की, “फायनली सिक्रेट सर्वांसमोर आले. आता आपण या विषयावर सार्वजनिक बोलू शकतो. तुम्हाला खूप खूप प्रेम.” यासोबत गौरी नलावडे, सिद्धार्थ बोडके, मयुरी देशमुख, तेजस्विनी पंडित, ऋता दुर्गुळे, श्रेया बुगडे यांनीं कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत संग्रामने देखील हा फोटो त्याच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे.

संग्राम आणि खुशबू हे दोघेही लोकप्रिय कलाकार आहेत. संग्रामने ‘पन्हाळा’, ‘दगडाबाईची चाळ’, ‘मितवा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने ‘सरस्वती’ आणि ‘देवयानी’ या मालिकेत काम केले आहे. त्याची देवयानी ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेत त्याच्यासोबत शिवानी सुर्वे ही मुख्य भूमिकेत होती. तसेच खुशबूने ‘एक मोहर अबोल’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘पारिजात’, ‘प्यार की एक कहाणी’, ‘तेरे लिये’, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘देवयानी’ या मालिकेत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा