Friday, November 22, 2024
Home मराठी Ashok Saraf यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

Ashok Saraf यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर आता संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव होणार आहे.(sangeet natak academy award announced to veteran actor ashok saraf) संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची आज घोषणा झाली.

शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. २०२२-२३ वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्कारांमध्ये अशोक सराफ(Ashok Saraf) यांच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री ऋतूजा बागवे हिलाही संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय गायिका देवकी पंडीत यांनाही संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय.

नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अशोक सराफ, ऋतुजा बागवे, देवकी पंडीत यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. नवी दिल्लीच्या नॅशनल अकॅडमी ऑफ म्युझिक, डान्स व ड्रामा यांच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

अशोक सराफ गेली अनेक वर्ष नाटक, सिनेमा क्षेत्रात कार्यरत आहेत. अशोक सराफ यांचं ‘व्हॅक्यूम क्लिनर’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजतंय. याशिवाय ऋतुजाची भूमिका असलेल्या ‘अनन्या’ नाटक रंगभूमीवर चांगलंच गाजलेलं. अपघातात हात गमावलेल्या अनन्याची प्रेरणादायी कथा या नाटकात दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe)

हेही वाचा:

मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत प्रशांत दामले यांनी केली नव्या ॲपची घोषणा

Premachi Goshta: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीचा आहे घरगुती व्यवसाय

author avatar
tdadmin

हे देखील वाचा