Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड सांगलीच्या पठ्ठ्याचा विषयच वेगळा! ‘पठाण’ सिनेमा पाहण्यासाठी आख्खं थिएटर केलं बुक, शाहरुखही म्हणाला…

सांगलीच्या पठ्ठ्याचा विषयच वेगळा! ‘पठाण’ सिनेमा पाहण्यासाठी आख्खं थिएटर केलं बुक, शाहरुखही म्हणाला…

मोस्ट अवेटेड शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाची उत्सुकता शिगेला येऊन ठेपली आहे. एकीकडे पठाण चित्रपटाचा वाद आहे तर दुसरीकडे चित्रपटाप्रती प्रेक्षकांप्रती उत्सुकता पाहायला मिळत आहे. पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच कोट्यावदी गल्ला जमवला आहे. एडवांन्स बुकिंगनेच चाहत्यांप्रती पठाणची क्रेज पाहायला मिळत आहे. काही प्रेक्षकांना तर टिकिट माळाली नाही म्हणून त्याने थेट अभिनेत्याकडेच धाव घेतली होती, अशातच अजून एका चाहत्याने असं काही केलं आहे ज्याुळे स्वत: शाहरुख भारावून गेला आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) याने पठाण (Pathan) चित्रपटाद्वारे मोठ्या ब्रेकनंतर शानदार कम बॅक केल्याने चाहते त्याचा चित्रपट बघण्यासाठी वेडे झाले आहेत. पठाण चित्रपट जेवढा वादाच्या घेऱ्यात अडकला त्याहूनही जास्त चित्रपट प्रेमींचा पाठिंबा दिसून येत आहे. पठाण चित्रपटाच्या टिकाची विक्री जोरदार सुरु आहेत. अनेक सिनेमागृहामध्ये हाउसफुलचे बोर्ड लागले आहेत.

प्रत्येकच चाहता पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी उत्सुक आहे. अशातच शहारुखच्या एका जबऱ्या फॅनने पठाण चित्रपट पाहाण्यासाठी चक्क पुर्ण थिएटरच बुक केलं आहे. सांगलीमधील एसआरके फॅनक्लबने ट्वीटरद्वारे एक फोटो शेअर केला. या फोटोबरोबरच सांगलीतील तरुणांनी थिएटर बुक केलं असल्याचं सांगितलं आहे. हे ट्वीट पाहिल्यानंतर शाहरुख देखिल भारावून गेला आहे.

सांगलीच्या या तरुणाला शाहरुखने देखिल ट्वीटरद्वारे उत्तर दिलं आहे. शाहरुख म्हणाला की, “धन्यवाद आणि आशा करतो की, तुम्हाला हा चित्रपट आवडेल.” त्याशिवाय आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमरावतीमधील एसआरके फॅनक्लबने ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या या तरुणांनी थिएटर बुक करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

शाहरुखच्या Tagsपठाण चित्रपटामुळे बॉलिवूडला मोठे यश प्राप्त होणार आहे. कारण 2020 साल हे वर्ष फक्त साउथ चित्रपटांनी गाजवलं आणि त्यांच्या चित्रपटांसमोर हिंदी चित्रपट फ्लॉप ठरले. आता पठाण कोणता नवीन इतिहास रचेल हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे. तेया बुधवार (दि, 25 जानेवारी) रोजी पठाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ओठांचे मग चुंबन व्हावे’ हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या प्रीवेडींग मधला ‘तो’ फोटो बघताच झाला सोशल मीडियावर धमाका
‘लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ’, म्हणणाऱ्या श्रेयस तळपदेने त्याच्या पोस्टमधून ‘रेशीमगाठ’बद्दल दिली हिंट

हे देखील वाचा