Wednesday, July 3, 2024

अभिनेत्री पायल रोहतगीचे ग्रॅन्ड वेडिंग रिसेप्शन, ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी

कॉमन वेल्थ हेवी वेट विजेते संग्राम सिंग आणि अभिनेत्री पायल रोहतगी यांच्या लग्नाला दीड महिना उलटून गेला आहे, पण सेलिब्रेशन अजूनही सुरू आहेत. आग्रा येथील ग्रॅण्ड वेडिंग, दिल्ली आणि अहमदाबादमधील रिसेप्शननंतर दोघांनी शनिवारी मुंबईतील जुहू येथील क्लब-द मिलेनियम हॉटेलमध्ये रिसेप्शनचे आयोजन केले होते. जिथे बॉलीवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींव्यतिरिक्त राजकारणाच्या क्षेत्राशी निगडित काही चेहरेही पाहायला मिळाले.

संग्राम सिंह आणि पायल रोहतगी यांचे अभिनंदन करण्यासाठी दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेत्री पूनम ढिल्लन, बिंदू दारा सिंह, काँग्रेस नेते संजय निरुपम हे प्रथम पोहोचले. यानंतर हळूहळू आणखी लोक येऊ लागले, ज्यामध्ये अभिनेत्री पूनम पांडे, कॉमेडियन सुनील पाल, एहसान खान, निर्माता दिग्दर्शक धीरज कुमार, अभिनेत्री गौहर खान, फ्लोरा सैनी दिसल्या.

हेही वाचा –
बापरे! सुगंधा मिश्राचा चेहरा बिघडला? व्हिडिओ पाहून व्हाल चकित
‘मला सलमानने घडवले नाही, मी सेल्फमेड आहे’, जेव्हा मलायकाच्या वक्तव्याने उडाली होती खळबळ
जॉनने दिला होता धोका, यामुळे होऊ शकले नाही बिपाशा-जॉन अब्राहमचे लग्न

हे देखील वाचा