Thursday, January 15, 2026
Home बॉलीवूड ‘निराधार’ म्हणत संजय दत्तने त्याच्या अपघाताच्या बातम्यांना ट्विट करत सांगितले अफवा

‘निराधार’ म्हणत संजय दत्तने त्याच्या अपघाताच्या बातम्यांना ट्विट करत सांगितले अफवा

संजय दत्त त्याच्या ‘केडी’ चित्रपटाची शूटिंग करत असताना त्याचा अपघात झाला आणि तो गंभीर जखमी झाला असल्याच्या अनेक बातम्या मीडियामध्ये आल्या. सोशल मीडियावरही अशा बातम्या खूपच व्हायरल झाल्या होत्या. या बातम्यांमुळे त्याचे फॅन्स खूपच चिंतेत होते. संजय दत्त लवकर बरा व्हावा यासाठी सतत प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र आता संजय दत्तने या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर ट्विट करत त्याने माहिती दिली आहे.

संजय दत्तने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत या बातम्यांना निराधार म्हटले आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले, “मी जखमी झाल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की, या सर्व बातम्या खोट्या, निराधार आहे. देवाच्या कृपेने मी ठीक आणि निरोगी आहे. मी ‘केडी’ सिनेमाची शूटिंग करत आहे. सिनेमातील सीन्सची शूटिंग करताना खूपच सावधगिरी बाळगली जात आहे. तुमच्या सर्वांच्या चिंतेसाठी, प्रार्थनेसाठी आणि माझ्याशी संपर्क करण्यासाठी धन्यवाद.”

दरम्यान संजय दत्त सध्या बंगळुरूमध्ये ‘केडी – द डेविल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तो खलनायक साकारणार आहे. यात ध्रुव सरजा, शिल्पा शेट्टी और रविचंद्रन मुख्य भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा तामिळ, तेलगू , कन्नड आणि मल्याळम मध्ये प्रदर्शित होणार आहे.

संजय दत्तने नुकतीच ‘लिओ’ची शूटिंग संपवली असून, ‘केडी’ आणि ‘लिओ’सोबतच संजय
संजय दत्त अपकमिंग फिल्म ‘द गुड महाराजा, घुड़चड़ी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शिवाय तो ‘हिअरा फेरी ३’मध्ये देखील दिसेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

हृदयविकारामुळे मनोरंजन विश्वाने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही व्हाल भावूक

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

हे देखील वाचा