बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान अभिनेता, आकर्षक लुक्स आणि व्यक्तिमत्व असलेल्या संजय दत्त नेहमीच विविध कारणांसाठी मीडियामध्ये चर्चेत असतो. कधी तो त्याच्या वैयक्तिक करणामुळे तर कधी व्यावसायिक कारणांमुळे संजय मीडियामध्ये गाजतोच. याच संजय दत्तबद्दल त्याच्या फॅन्सला चिंतेत टाकणारी एक बातमी समोर येत आहे. नुकताच संजयचा चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे.
संध्या संजय दत्त त्याच्या आगामी ‘केडी: द डेविल’ या सिनेमाची बंगळुरूमध्ये शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एका विस्फोटाच्या सीनची शूटिंग चालू होती त्याच वेळे हा अपघात झाला आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार संजय दत्तला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला हात, चेहरा आणि कोपऱ्याला बऱ्यापैकी लागले आहे. तो फाइट मास्टर असणाऱ्या रवि वर्मा यांच्या केडी: द डेविल चित्रपटातील एका फाइट सीनची तयारी करत होता. याच दरम्यान हा अपघात झाला. सेटवरील लोक आणि त्याचे फॅन्स सर्वच तो लवकर बारा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे.
दरम्यान संजय दत्तच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तो केजीएफ १ आणि केजीएफ २मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. आता पुन्हा एकदा तो कन्नड सिनेमा असलेल्या केडी: द डेविल मध्ये खलनायक साकारणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिक्स पॅक्सला व्हीएफएक्स म्हणणाऱ्या ट्रोलर्ससाठी शर्टलेस झाला सलमान, फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी
भरलेल्या स्टेडियममध्ये अभिषेकवर चिडली ऐश्वर्या; भाची नव्यावर देखील दाखवला राग, व्हिडिओ व्हायरल