Friday, March 29, 2024

संजय दत्तने पत्नीला गिफ्ट केले चक्क १०० कोटींचे फ्लॅट; पण ती म्हणाली मला नकोय! वाचा कारण

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हा आपल्या शैली आणि चित्रपटांसाठी ओळखला जातो. गेल्याच वर्षी संजय दत्तने कर्करोगासारख्या आजारावर विजय मिळविला होता. तो आता लवकरच ‘केजीएफ पार्ट २’ मध्येही दिसणार आहे. याखेरीज संजय दत्तने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पत्नी मान्यता दत्तला चार फ्लॅट भेट (गिफ्ट) म्हणून दिले. विशेष म्हणजे त्या चार फ्लॅटची किंमत तब्बल 100 कोटींपेक्षाही जास्त होती. परंतु आश्चर्य म्हणजे, संजय दत्तची ही भेट मान्यता दत्तने परत केली आहे.

सन 2020 मध्ये संजय दत्तने 23 डिसेंबर रोजी आपल्या पत्नीला फ्लॅट भेट दिले, तर मान्यताने त्याला 29 डिसेंबरला परत केले. संजय दत्तने गिफ्ट केलेले हे अपार्टमेंट्स मुंबईतील पाली हिल येथे असलेल्या इम्पिरियल हाईट्स इमारतीत होते. जेथे बॉलिवूडमधील इतर अनेक स्टार्स राहतात.

माध्यमांतील वृत्तांनुसार, दोन फ्लॅट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर होते, तर उर्वरित दोन फ्लॅट्स इमारतीच्या 11 व्या आणि 12 व्या मजल्यावर होते. या चार फ्लॅटचे बाजार मूल्य 100 कोटींपेक्षा जास्त होते. असे म्हटले जात आहे की, कर संबंधित व्यवहारामुळे मान्यता दत्तने हे फ्लॅट परत केले आहेत.

याशिवाय संजय दत्तच्या वर्क कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार यश यासोबत ‘केजीएफ पार्ट २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त अधीराची भूमिका साकारणार आहे, ज्याचा लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. केजीएफमध्ये संजय दत्तसह रवीना टंडन आणि प्रकाश राजसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.

संजय दत्तच्या तब्येतीबद्दल बोलताना त्याने गेल्या वर्षी एक पोस्ट शेअर केली होती आणि सांगितले होते की त्याने या आजाराशी लढाई जिंकली आहे. त्याने या पोस्टद्वारे आपल्या प्रियजनांचे आभारही मानले होते.

हेही वाचा-

श्वास रोखून धरा! १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री; सिनेमाचे पोस्टरही झाले रिलीझ

हे देखील वाचा