बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीत सर्वात आधी नाव घेतले जाते ते माधुरी दीक्षितचे. माधुरीने तिच्या सौंदर्याने, तिच्या हसण्याने आणि तिच्या नृत्याने सर्वच पिढीतील लोकांच्या मनावर छाप सोडली आहे. इंडस्ट्रीमधील अतिशय उत्तम डान्सर अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव नेहमीच वर येते. माधुरीने नेहमीच तिच्या नृत्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. तिच्या नृत्य कौशल्याचे कौतुक खुद्द दिवंगत बिरजू महाराज, सरोज खान, प्रभुदेवा अशा डान्समधील महारथींनी केले आहे. त्यामुळे माधुरीसोबत डान्स करायला मिळणार याचा कलाकरांना आनंद होण्यापेक्षा जास्त टेन्शनच आल्याचे अनेकदा दिसून येते. असेच टेन्शन आले होते अभिनेते संजय कपूर यांना.
संजय कपूर यांनी माधुरीसोबत डान्स करण्याचा एक किस्सा मुलाखतीदरम्यान सर्वांनाच सांगितला होता. संजय कपूर यांनी माधुरीसोबत ‘राजा’ या सुपरहिट सिनेमात काम केले होते. १९९५ साली आलेला हा सिनेमा तुफान गाजला होता. शिवाय या सिनेमातील ‘अंखियां मिलाऊं’ हे गाणे तर आजही गाजताना दिसते. हे गाणे या गाण्यातील डान्स आणि एक्सप्रेशन आजही लोकांना वेड लावते. याच गाण्याशी संबंधित एक किस्सा संजय यांनी सांगितला होता.
View this post on Instagram
संजय कपूर म्हणाले, “आमच्या गाण्याची शूटिंग फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये होत होती आणि त्या गाण्याच्या शूटिंग आधी दररोज मी सत्यम हॉलमध्ये जायचो. अहमद खान माझ्यासोबत डान्सचा सराव करायचे. मी सरोजजी यांच्यासोबत एक व्यवहार केला होता. तो व्यवहार म्हणजे मी सकाळी त्या गाण्याच्या ह्या भागाचा सराव करेल तोच भाग त्याच दिवशी सर्वात आधी शूट केला जाईल. जेणेकरून मी माधुरीसोबत थोडाफार चांगला डान्स करताना दिसेल.” मात्र पुढे संजय कपूर आणि माधुरी यांनी ते गाणे उत्तम पद्धतीने शूट केले आणि आजही ते टॉपवर असलेले ऑल टाईम हिट गाणे आहे.
दरम्यान संजय कपूर यांनी १९९५ साली ‘प्रेम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ते माधुरीसोबत ‘राजा’ सिनेमात दिसले आणि एका रात्रीत स्टार झाले. संजय हे बोनी कपूर आणि अनिल कपूर यांचे भाऊ आहेत. त्यांनी चित्रपटांसोबतच टीव्हीवर देखील काम केले आहे. आता ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अनेक वेबसिरीजमध्ये काम करताना दिसतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुभव सिन्हा यांच्या सांगण्यावरून आशुतोष राणा यांनी रागाच्या भरात राजकुमाराला लगावली होती चापट
‘तो एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो’ कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा सलमान खानच्या राहणीमानाबद्दल खुलासा