बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना दिसते. ती तिचे फोटो नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो शेअर होता क्षणीच व्हायरल होत असतात. शनाया कपूरचा काही तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती संजना मुथरेजा हिच्यासोबत बेली डान्स करताना दिसत आहे. नेहमी प्रमाणेच शनायाचा या डान्स व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. शनाया ही लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बॉलिवूडमध्ये येण्याआधीच तिचे सोशल मीडियावर लाखोंमध्ये फॅन फॉलोविंग आहे. यामध्ये तिने इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
शनायाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढरा रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती एब्ज फाँट करताना दिसत आहे.
तिचा हा फोटो सर्वांना खूप आवडत आहे. अनेकजण कमेंट करून तिच्या या फोटोचे कौतुक करत आहेत. अशातच तिचे वडील संजय कपूर यांनी तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे की, “तू मला तुझे एब्ज देऊ शकते का?”
या दिवसात शनाया धर्मा प्रॉडक्शनमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे, या बातम्या येत आहेत. त्यामुळे ती खूप चर्चेत आहे. ती तिच्या बोल्डनेस मुळे खूप चर्चेत असते.
https://www.instagram.com/p/CCyCzDSAtkq/?utm_source=ig_web_copy_link
शाहरुख खानची मुलगी सुहाना कपूर आणि अनन्या पांडे या शनायाच्या मैत्रिणी आहेत. आताच काही दिवसांपूर्वी त्यांनी सुहानाचा न्यूयॉर्कमध्ये वाढदिवस साजरा केला आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…